“साहेब ज्यांना अशापद्धतीने भेटले ते पुन्हा सत्तेत आले नाहीत”; मोदी-योगींच्या ‘त्या’ फोटोवरुन टोला

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत शेअर केलेल्या फोटोवरुन काँग्रेसच्या नेत्याने लगावला टोला

Modi And Yogi Photo
योगी आदित्यनाथ यांच्यावर साधला निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतेच पूर्वांचल द्रुतगती मार्गाचे उद्घाटन केले. उत्तर प्रदेशात पुढील वर्षारंभी विधानसभेची निवडणूक होणार असून योगी आदित्यनाथ सरकारकडून विविध विकासकामांचा दावा केला जात आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी रविवारी ट्विटरवर पंतप्रधान मोदी यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. विकासाच्या मार्गाने नवा देश घडवण्याच्या संकल्प आम्ही केलाय अशा अर्थाची कॅप्शन योगी यांनी या फोटोला दिलीय. मात्र आता याच फोटोवरुन काँग्रेसच्या नेत्यांकडून खोचक प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. चंदीगढमधील काँग्रसचे नेते अशोक बासोया यांनीही अशाच प्रकारची खोचक प्रतिक्रिया या फोटोवर दिलीय.

नक्की वाचा >> “तुमसे ना हो पाऐगा…”, “”जगाला दाखवण्यासाठी राजकारणामध्ये तुम्हाला काही..”; ‘त्या’ फोटोवरुन विरोधकांचे टोमणे

योगी आदित्यनाथ यांनी शेअर केलेल्या दोन फोटोंमध्ये पंतप्रधान मोदी योगींच्या पाठीवर हात ठेऊन चालल्याचं दिसत आहेत. योगींच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या फोटोंपैकी एक फोटो समोरुन तर एक फोटो पाठमोरा आहे. या फोटोंवरुन सोशल नेटवर्किंगवर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. भाजपा समर्थकांकडून या फोटोच्या माध्यमातून मोदींचा योगींवरील विश्वास दिसून येत असल्याचा दावा केला जातोय. तर काँग्रेस आणि विरोधी पक्षाच्या समर्थकांनी मोदींवर टीका केलीय. असाच एक टोला अशोक बासोया यांनी मोदी आणि योगींचा हा व्हायरल फोटो कोलाजमध्ये शेअर करत लगावला आहे.

पंतप्रधान मोदीजी आतापर्यंत ज्या ज्या नेत्यांना भेटलेत ते पुन्हा सत्तेत आले नाहीत अशी अर्थाच्या कॅप्शनसहीत अशोक यांनी पंतप्रधानांचे चार नेत्यांसोबतचे फोटो शेअर केलेत. यामध्ये मोदी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, इस्रायलचे माजी राष्ट्राध्यक्ष बेन्यामिन नेतान्याहू, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा फोटो आहे. तर शेवटच्या फोटमध्ये योगी आणि मोदी एकत्र चालताना दिसत आहेत. “ज्यांना (मोदी) साहेब अशापद्धतीने भेटले तो (नेता) पुन्हा सत्तेत आला नाही,” असं अशोक यांनी हा फोटो शेअर करत म्हटलं आहे.

या फोटोच्या माध्यमातून आगामी उत्तर प्रदेश निवडणुकांमध्ये सध्या सत्तेत असणाऱ्या योगी आदित्यनाथ यांचा म्हणजेच भाजपाचा पराभव होणार असल्याचे संकेत या काँग्रेसच्या नेत्याने देण्याचा प्रयत्न केलाय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Congress leader shares modi and yogi photo with sarcastic photo caption scsg

Next Story
…म्हणून हे छायाचित्र इंटनरनेटवर ठरतयं प्रचंड लोकप्रियThis One Photo Sums Up the Difference Between the Generations , viral photo, The internet loves this photo , Loksatta, loksatta news, Marathi, Marathi news
ताज्या बातम्या