Congress Spokesperson Fact Check : लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ शेअर केला जात असल्याचे आढळले; ज्यात दावा केला गेला आहे की, काँग्रेस पक्षाच्या विरोधात बोलताना दिसणारी व्यक्ती ही काँग्रेस आमदार अनिल उपाध्याय आहे. व्हिडीओमध्ये हे आमदार महोदय देशातील दंगलीसाठी काँग्रेस पक्ष, काँग्रेस खासदार राहुल गांधी, सोनिया गांधी आणि त्यांचे नेते दोषी असल्याचे सांगताना दिसत आहेत. पण, खरेच काँग्रेस नेत्याने असे कोणते विधान केले आहे का? यामागची सत्यता जाणून घेऊ.

काय होत आहे व्हायरल?

X युजर @Verma18311652 ने त्याच्या हॅण्डलवर एक भ्रामक दावा करून व्हिडीओ शेअर केला आहे.

इतर वापरकर्तेदेखील अशाच प्रकारच्या दाव्यांसह व्हिडीओ शेअर करीत आहेत.

तपास :

आम्ही व्हिडीओचे स्क्रीनशॉट्स घेतले तेव्हा आम्हाला त्यावर ‘द न्यूजपेपर एक्सक्लुझिव्ह’ असा वॉटरमार्क सापडला.

त्यानंतर आम्हाला ‘द न्यूजपेपर’ नावाचे YouTube अकाउंटदेखील सापडले.

चॅनेलवरील सर्वांत जुने व्हिडीओ तपासताना आम्हाला चॅनेलवर व्हायरल झालेला व्हिडीओ आढळला. हा व्हिडीओ दोन मिनिटांच्या व्हायरल क्लिपच्या तुलनेत सुमारे ११ मिनिटांचा होता.

व्हिडीओचे शीर्षक होते : राहुल गांधी पर प्रोफेसर ने ऐसा क्या कहा कि लोगों ने उन्हे गोद में उठा लिया |) दिल्ली

अनुवाद : राहुल गांधींबद्दल या प्राध्यापकाने असे काय म्हटले, की लोकांनी त्यांना उचलून धरले | दिल्ली

हा व्हिडीओ ५ मार्च २०२० रोजी अपलोड करण्यात आला होता. व्हिडीओमध्ये बोलणारी व्यक्ती काँग्रेस पक्षाची सदस्य असल्याचे कुठेही नमूद केलेले नाही.

त्यानंतर अनिल उपाध्याय नावाचा कोणी काँग्रेस आमदार आहे का, हे तपासण्याचा आम्ही प्रयत्न केला. तेव्हा आम्हाला myneta.info वर तपशील सापडला; ज्याचा आम्ही तपास सुरू केला.

https://www.myneta.info/search_myneta.php?q=Anil+Upadhyay

यावेळी आम्हाला आढळून आले की, अनिल उपाध्याय ही व्यक्ती कोणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची आमदार नव्हती. त्यावेळी आम्हाला अनिल उपाध्याय नावाच्या उमेदवाराबद्दलची माहिती समोर आली, जी कुरुक्षेत्रमधून अपक्ष (IND) उमेदवार होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
https://www.thehindu.com/elections/candidates/LokSabha2024/pandit-anil-upadhyay-8630/

निष्कर्ष : व्हायरल व्हिडीओमध्ये काँग्रेसवर टीका करताना दिसणारी व्यक्ती काँग्रेस नेता किंवा आमदार नाही. २०२० चा हा व्हिडीओ दिशाभूल करणाऱ्या दाव्यांसह शेअर केला जात आहे.