सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका लग्न समारंभात एक जोडपं बेभान नाचताना दिसत आहे. सजना जी वारी वारी…गाण्यावर या जोडप्याने केलेला डान्स पाहण्यासारखा आहे. मात्र या जोडप्याचा डान्स बघायचा सोडून नेटकऱ्यांनी व्हिडिओमध्ये एका वेगळ्याच गोष्टीवर लक्ष केंद्रित केले आहे. ज्यामुळे या व्हिडिओची जास्त चर्चा रंगली आहे. तुम्हीही हा व्हिडीओ एकदा पाहाच..

लग्नात नाचतंय जोडपं.. मात्र ‘या’ गोष्टीमुळे होतेय चर्चा

हा व्हायरल व्हिडिओ नुपूर चितळे नावाच्या अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. छोट्या क्लिपमध्ये, एक जोडपे सजना नी वारी वारी गाण्यावर आनंदाने नाचताना दिसत आहे. ते एकमेकांमध्ये पूर्णपणे हरवले आहेत आणि कोणीही त्यांना पाहत नसल्यासारखे नाचत आहेत. या व्हिडिओमध्ये नेटकऱ्यांचे लक्ष आणखी एका गोष्टीवर केंद्रित झाले आहे. ते म्हणजे या जोडप्यापासून काही अंतरावर, तीन महिला एकेमकांसोबत हाताचे हावभाव करत तसंच एकमेकांचे चुंबन घेत बोलताना दिसत आहे. त्यामुळे या महिलांमध्ये नक्की कोणती चर्चा रंगली असेल, यावर नेटकऱ्यांचे जास्त लक्ष आहे.

( हे ही वाचा: २ रिक्षाचालकांचा रस्त्यावरील ‘तो’ डान्स होतोय Viral; नागालँडचे मंत्री Video शेअर करत म्हणाले, ‘लोकांनी…’)

येथे पाहा व्हिडिओ

( हे ही वाचा: Video: चिमुकल्याने चालु स्कूटीचा अचानक अ‍ॅक्सिलेटर फिरवला अन्…; मुलांकडे दुर्लक्ष करणे जीवावर कसे बेतू शकते एकदा पाहाच)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खरं तर या व्हिडिओ मध्ये जोडप्याच्या डान्सपेक्षा या तीन महिलांची चर्चा जास्त होताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत असून या व्हिडिओला आतापर्यंत ६ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसंच अनेकजण यावर आपल्या वेगवेगळ्या कंमेंट देखील देत आहेत. काहींना या जोडप्यामधील प्रेम पाहून आनंद झाला आहे, तर काहींना या महिलांबद्दल खूप उत्सुकता वाटत आहे. एका वापरकर्त्याने लिहिले आहे की, “खरं तर या महिला मुख्य पात्र आहेत पण त्यांना हे माहित नाही.” आणखी एका युजरने कमेंट केली, “या व्हिडिओमध्ये बरेच काही चालले आहे.” तिसर्‍याने लिहिले, “मी मागचा कंटेंट पाहत होतो.”