भारताचा माजी क्रिकेटपटू, अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने नुकताच आपल्या लग्नाचा आठवा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त त्याने पत्नीसाठी एक भावूक पोस्ट सोशल मीडियावर लिहिली. तसेच पहिल्यांदाच त्याने पत्नीचा चेहरा दाखविला. याआधी त्याची पत्नी नेहमीच हिजाब परिधान केलेली किंवा चेहरा झाकलेली दिसत असे. मात्र इरफानने पहिल्यांदाच पत्नीचा चेहरा दाखविल्यानंतर हा फोटो सध्या व्हायरल होत आहे.

इरफान पठाणने आपल्या पोस्टमध्ये पत्नी सफा बेगसाठी त्याच्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, “माझी पत्नी अनेक भूमिका पार पाडत असते. उत्साही वातावरण ठेवणं, उत्तम विनोदबुद्धी, अडचणी ओढवून घेणारी, माझी सहचरणी, चांगली मित्र आणि माझ्या मुलांची आई.. अशा अनेक भूमिकात ती दिसते. आजवरच्या या सुंदर प्रवासात तुझ्यासारखी पत्नी माझ्या जीवनात आहे, याचा आनंद वाटतो. लग्नाच्या आठव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.” या भावनिक कॅप्शनसह इरफान पठाणने पत्नीबरोबर एक फोटो शेअर केला आहे. त्याने पहिल्यांदाच आपल्या पत्नीचा फोटो सार्वजनिक केला आहे.

Confusion on Virat's wicket in , KKR vs RCB match
KKR vs RCB : आऊट की नॉट आउट? अंपायरच्या निर्णयावर विराट कोहली दिसला नाराज, जाणून घ्या काय आहे नियम?
Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”
Actor Sonu Sood made an anonymous post about trolling of Hardik Pandya
IPL 2024 : एक दिवस कौतुक करायचं, दुसऱ्या दिवशी हुर्यो उडवायची अशी वागणूक देशाच्या हिरोंना देऊ नका – सोनू सूद
hardik pandya
हार्दिकच्या योजनांचे आश्चर्य! बुमराच्या वापरावरून स्मिथकडून मुंबई इंडियन्सच्या कर्णधारावर टीका

IND vs ENG : बुमराहसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी टेकले गुडघे, भारताने पहिल्या डावाच्या जोरावर घेतली १४३ धावांची आघाडी

इरफान पठाणने यापूर्वी पत्नीसह फोटो शेअर केले होते. मात्र त्यात पत्नी पूर्ण हिजाबमध्य दिसत असे. यामुळे अनेक लोक त्याच्यावर टीका करत असत.

इरफान पठाणने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी समालोचक या नात्याने तो क्रिकेटशी आपली नाळ जोडून आहे. समालोचनाचे काम करत असताना तो नवख्या खेळांडूंना प्रेरणा देण्याचे, त्यांना पाठबळ देण्याचेही काम करतो.

Ind vs Pak: तेव्हा माझा डोळा फुटला असता, पण आम्ही त्याचा बाऊ केला नाही- इरफान पठाण

काही दिवसांपूर्वीच त्याने शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्या खराब फॉर्मनंतर दोन्ही तरूण फलंदाजांची बाजू उचलून धरली होती. “विराट कोहली सध्या संघात उपलब्ध नाही, केएल राहूल दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने थोडा वेगळा विचार करत तरूण फलंदाजांना पुन्हा एकदा संधी देऊन पाहायला हवी”, अशी प्रतिक्रिया इरफान पठाणने एशियन लिजंड्स लिगच्या उद्घाटनावेळी दिली होती, अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली.

इरफान पठाण पुढे म्हणाला की, गिल आणि अय्यर या दोघांनी काही काळापासून समाधानकारक कामगिरी केलेली नाही. पण असले तरी ते पुढेही उत्तम कामगिरी करूच शकणार नाहीत, असे होत नाही.

दरम्यान इरफानने सध्या भारत वि. इंग्लंड यांच्यात चालू असलेल्या कसोटी सामन्यांवरही प्रतिक्रिया दिली. पहिल्या कसोटीत इंग्लंडने २८ धावांनी भारताचा पराभव करून १-० अशी आघाडी घेतली आहे. विखाखापट्टणम येथे आता दुसरी कसोटी खेळली जात आहे. दुसऱ्या कसोटीबाबत बोलत असताना इरफान म्हणाला की, यजमान इंग्लंड सध्या वाहनातील चालकाच्या जागेवर आहेत.

दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात यशस्वी जयस्वालच्या द्विशतकाच्या जोरावर ३९६ धावांचे लक्ष्य इंग्लंडसमोर ठेवले होते. इंग्लंडचा डाव २५३ धावांवर आटोपला. बुमराहने या डावात अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत ६ बळी घेतले. दुसऱ्या डावाची सुरुवात झाल्यानंतर भारताने यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार रोहित यांना लवकर गमावलं. त्यानंतर गिल आणि अय्यर सध्या खेळपट्टीवर आहेत. इरफान पठाणने या दोन फलंदाजांबद्दल आशा व्यक्त केल्या होत्या. त्यामुळे दोघांच्याही खेळीकडे सर्वांचे लक्ष आहे.