Crocodile Attack Video: सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी मनोरंजक असतात, तर कधी हृदयाचे ठोके चुकवणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. जगात कोणत्याही प्राण्याचा नाद करा; पण कधीच मगरीचा नाद करू नका, असं म्हटलं जातं. कारण- मगर शिकार करण्यासाठी काहीही करू शकते. असाच काहीसा अनुभव देणारा एक थरारक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हीही हादरून जाल.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे, जो पाहून अनेकांच्या अंगावर काटा येत आहे. सुरुवातीला सर्व काही सामान्य वाटतं; पण काही क्षणांत जो थरार उलगडतो, तो कुठल्याही अॅक्शन सिनेमालाही लाजवेल असा आहे. कारण- या व्हिडीओमध्ये एक तरुण पुलावरून नदीत उडी घेतो आणि काही सेकंदांतच एक विशालकाय मगर त्याच्यावर हल्ला चढवते.

अचानक नदीत उडी आणि जीवावर बेतलेला क्षण

व्हिडीओमध्ये दिसतं की, एक तरुण पुलाच्या कडेला उभा आहे. काही कळायच्या आत तो नदीत उडी मारतो. पाहणाऱ्यांना वाटतं की, हा कदाचित स्टंट असेल किंवा एखादा ट्रेंड तो फॉलो करत असेल. पण, पुढील काही क्षणांत जे घडतं, ते दृश्य भीषण आणि धडकी भरवणारं आहे.

तो तरुण पाण्यात पडताच नदीच्या पाण्यात एक मोठी हालचाल होते आणि एक विशालकाय मगर तुफानी वेगाने पाण्यातून वर येते. ती थेट त्या दिशेने झेपावते, जिथे तो तरुण पडलेला असतो. हा हल्ला इतका अचानक आणि वेगवान असतो की, बघणाऱ्यांचेही श्वास रोखले जातात.

नशीब बलवत्तर म्हणून वाचला

सुदैवाने, तो तरुण त्या क्षणी पूर्णपणे पाण्यात बुडतो आणि मगरीचा हल्ला त्याच्याकडून चुकवला जातो. जर त्याने काही सेकंदे उशिरा उडी घेतली असती, तर तो क्षण त्याच्या दुर्दैवी मृत्यूचा ठरला असता. हा सगळा प्रकार इतका झपाट्यानं घडतो की, क्षणभरासाठी सगळं काही थांबल्यासारखं वाटतं. व्हिडीओ पाहणाऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देत हा एक चमत्कार असल्याचं म्हटलं आहे; तर काहींनी तरुणाच्या अत्यंत बेजबाबदार वागण्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथे पाहा व्हिडीओ

निसर्गाशी खेळ म्हणजे मृत्यूला निमंत्रण!

हा व्हिडीओ आपल्याला शिकवतो की, साहस आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्याच्या नादात निसर्गाला चुकीच्या पद्धतीनं गोंजारत खेळणं किती घातक ठरू शकतं. प्राणी आपल्या नैसर्गिक प्रवृत्तीनुसार वागतात; पण मानवानं त्यांचा अंदाज घेण्याचा अट्टहास केल्यास, त्याचा परिणाम जीवावर बेतण्यातही होऊ शकतो.