Crocodile Attack Fisherman Video Viral : मगर ही सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी एक मानली जाते. जिच्या हल्ल्यातून भल्याभल्या प्राण्यांची सुटका होणं कठीण असते, त्यामुळे मगरीपासून मनुष्यचं नाही तर सर्वच प्राणी अंतर ठेवून राहतात. कारण एकदा का कोणता प्राणी तिच्या तावडीत सापडला तर त्याचे तुकडे केल्याशिवाय ती सोडत नाही. मगरीने प्राण्यांची शिकार केल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, जे पाहिल्यानंतर डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण होते. सध्या मगरीच्या हल्ल्याचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुमच्या काळजात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही.

सोप्या शब्दांत सांगायचे तर जंगल ही एक युद्धभूमी आहे, जिथे सर्व प्राणी स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरतात. अशाच प्रकारे एक मगर शिकारीसाठी मरण्याचं नाटक करते. यानंतर मच्छीमार जवळ पोहोचताच असं काही स्वत:चं रौद्र रुप दाखवते की पाहणाऱ्याच्या काळजात धडकी भरेल. मगरीची ही हुशारी पाहिल्यानंतर सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलेय, कारण कोणीही विचार केला नव्हता की मगर पाण्यात शिकार करण्यासाठी अशी युक्ती अवलंबेल.

व्हिडीओमध्ये दिसतंय की, एक भलीमोठी मगर पाण्यात आरामात पडून आहे. पाहताना असं वाटतं की, तिचा मृत्यू झालाय, त्यामुळे तिचे शरीर अशाप्रकारे पाण्यावर तरंगतेय. हेच समजून मच्छीमारांचा एक ग्रुप मगरीच्या अगदी जवळ आपली बोट घेऊन जातात, तोपर्यंत मगर काहीच हालचाल करत नाही; पण जेव्हा मच्छीमार मगर जिवंत आहे की नाही हे तपासण्यासाठी तिच्या तोंडाजवळ काठी नेतो, तेव्हा मगर अचानक झडप घालते आणि पूर्ण ताकदीने काठीला पकडण्याचा प्रयत्न करते. मगर इतक्या वेगाने झडप घालते की, मच्छीमार खूप घाबरतात. या संपूर्ण घटनेतून एक मोठा धडा मिळतो की, वन्य प्राण्यांना कधीही हलक्यात घेऊ नये.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मगरीचा धडकी भरवणारा व्हिडीओ

मगरीचा हा भयानक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर hereyourjumpscare नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर लोकही वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, पाण्यातील हा भयानक शिकारी खरोखर कोणालाही मारू शकतो. दुसऱ्याने लिहिले की, जर तुम्ही हा व्हिडीओ पाहिला तर दिसेल की, या लोकांनी काहीतरी मूर्खपणा केला आहे. तिसऱ्याने लिहिले की, जर ते मच्छीमार मगरीच्या तावडीत सापडले असते तर ते संपलेच असते.