School Viral Video: ‘छडी लागे छम छम, विद्या येई घम घम’ हे दिवस जाऊन आता शाळांमध्ये हसत-खेळत शिक्षणप्रणाली आहे. शिक्षक हे मुलांचे भविष्य घडविण्याचे काम करतात. कधी ते चांगल्या कामगिरीसाठी विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप देतात; परंतु कधी चुकीची वर्तणूक केल्याबद्दल शिक्षाही देतात. तुम्हालाही तुमच्या शिक्षिकेकडून कधी ना कधी एखाद्या चुकीबद्दल शिक्षा मिळाली असेल. परंतु, काही शिक्षक विद्यार्थ्यांच्या छोट्या छोट्या चुकीचीही इतकी भयानक शिक्षा देतात की, आपण कधी त्याबाबत विचारही करू शकत नाही. असाच एक धक्कादायक प्रकार सध्या उत्तर प्रदेशातील कन्नौजमधून समोर आला आहे. त्यामध्ये एका शिक्षिकेने विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केलीय. हा मार इतका निर्दयी होता की, पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.. या संबंधीचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून कोचिंग क्लासचे शिक्षक अवघ्या दुसरीत शिकत असलेल्या एका मुलीला केस ओढून निर्दयीपणे मारत आहेत. या व्हिडीओमध्ये पाहू शकता, शिक्षकांच्या मारापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी ही चिमुकली एका टेबलाखाली आणि खुर्च्यांच्या मागे लपण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, या निर्दयी शिक्षकाने तिथूनही या चिमुकलीला बाहेर काढले आणि तिचे केस ओढत तिला मारहाण केली. त्यानंतर शिक्षकाने मुलीच्या पाठीवर मारलं. यावेळी वेदनांमुळे अक्षरश: चिमुकली जमिनीवर लोळताना दिसत आहे. शिक्षक एवढ्यावरच थांबला नाही, तर त्यांनी काठी घेऊन मुलीला मारहाण केली.

मुलगी पुन्हा भीतीने रडू लागते आणि पुन्हा बाकाखाली लपण्याचा प्रयत्न करते. मात्र, शिक्षकाने तिचे पाय धरून तिला बाहेर काढले अतिशय संतापजनक असा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धडकी भरेल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> लोकांच्या जिवाशी खेळ! महिलांनो तुम्हीही फ्रोजन वाटाणे वापरता का? ‘हा’ VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आरोपी शिक्षकाला अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ते व्हायरल झालेल्या व्हिडीओचीही तपासणी करत आहेत. एडीजी कानपूर झोनने व्हायरल व्हिडीओला उत्तर दिले आणि कन्नौज पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले.