झोमॅटो अनेकदा आपल्या ग्राहकांसह मजेशीर पोस्ट शेअर करतात. सोशल मीडियावर मजेदार प्रतिक्रिया आणि सकारात्मक उपक्रमांच्या बाबतीत झोमॅटो सर्वात वेगवान असल्याचे म्हटले जाते. दरम्यान सध्या सोशल मीडियावर झोमॅटोने ग्राहकाबरोबर झालेल्या मजेशीर संवादाचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. सोशल मीडियावर हे चॅट व्हायरल झाले आहे. हे चॅट वाचून तुम्हालाही हसू येईल.

कंटेंट निर्माता मान तोमर याने शेअर केलेला ‘छपाक’ नावाचा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा खेळाचा एक व्यक्ती “एक मछली (एक मासा)” असे म्हणतो त्यानंतर दुसरा व्यक्ती “पाणी में गई (पाण्यात गेली) असे म्हणतो आणि तिसरा व्यक्ती टाळी वाजवतो आणि “छपाक” असे म्हणतो. ही खेळाची एक फेरी झाली त्यानंतर प्रत्येक फेरीसह हे वाक्य म्हणण्याची संख्या अनुक्रमे वाढत जाते. सोशल मीडियावर अनेकजण हा खेळ खेळता व्हिडीओ पोस्ट करत आहे तर काही लोक त्याची मीम्स तयार करून शेअर करत आहे. दरम्यान या खेळाचं वेड आता झोमॅटोलाही लागले आहे.

हेही वाचा – Optical Illusion: तुमची नजर तीक्ष्ण आहे का? मग ११ सेंकदात चेरीमध्ये दडलेले टोमॅटो शोधून दाखवा!

शुक्रवारी झोमॅटोने X वर एका ग्राहकाबरोबरच्या संवादाचा स्क्रीनशॉट पोस्ट केला आहे. रितिका नावाच्या ग्राहकाने झोमॅटो अॅपवरून जेव्हा सिंगल फिश फ्रायची ऑर्डर दिली तेव्हा तिला उत्तर देताना झोमॅटोच्या ग्राहक कस्टरमर सर्व्हिस तर्फे तिला पानी में गई असी मजेशीर प्रतिक्रिया दिली.
छपाक गेमचा सध्या सुरू असलेला ट्रेंड पाहाता हा विनोदाची वेळ नक्कीचं परेफेक्ट होती.,एवढंच नाही तर ग्राहकाने देखील विनोद ओळखून त्यावर छपाक असे उत्तरही दिले. झोमॅटोचे ग्राहकासह झालेले हे चॅट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या हलक्याफुलक्या संवादाला सोशल मीडिया खूप पसंती मिळत आहे. एक्सवर या पोस्टला ३,३२,००० पेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे तरप ८०००लोकांनी पंसती दर्शवली आहे. अनेक वापरकर्त्यांनी झोमॅटोच्या विनोदबुद्धीचे कौतुक केले.

हेही वाचा – कर्माचे फळ! हत्तीला काठीने हुसकावणे व्यक्तीला पडले महागात; हत्तीने कशी घडवली त्याला अद्दल, पाहा Video

एका वापरकर्त्याने लिहिले, “बघा ते अधिक मनोरंजक आहेत.” दुसरा म्हणाला, “वाह झोमाटो, खूप छान .” तिसऱ्याने उपहासात्मकपणे उल्लेख केला, “प्रीपेड ऑर्डर होती- पैसे देखील पाण्यात गेले, छपाक.” चौथ्याने लिहले, “ग्राहक आणि ग्राहक काळजी घेणारा यांच्यातील एक उत्तम संवाद.”

एकाने लिहिले की, “जर तुम्ही हे केले तर मी स्विगीमध्ये जाईन”. दुसऱ्याने लिहिले की, “मासे पाण्यात गेले तर चांगले होईल पण ग्राहक सेवा पाण्यात नाही गेली पाहिजे.”. एकाने लिहिले की,”अशा उत्तरांमुळे मी त्यांच्याकडे तक्रार करणे बंद केले आहे.”

एकाने लिहिले , “जेव्हा दोन मजेशीर लोक भेटतात तेव्हा अशा प्रकारचे संभाषण होते.” एकाने लिहिले, ग्राहक आणि कस्टमर केअरमध्ये किती आश्चर्यकारक संवाद आहे!