Rs 4 lakh Shoes Viral Video: आयुष्यभर कष्ट केलेल्या आई-वडीलांना सुखाचे दिवस दाखवायचे, त्यांच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करायच्या असे सगळ्यांचे मुलांचे स्वप्न असतं. आई वडिल बोट ठेवतील ती वस्तू त्यांना द्यायची अशी बरीच स्वप्न मुलं आई वडिलांसाठी बघत असतात. मात्र काहीवेळा आई-वडील जास्त खर्च, महागड्या वस्तू वापरण्यास नकार देतात, गरीबीतून वर आलेल्या पालकांना वायफळ खर्च नकोसा वाटतो. दरम्यान वडिल आणि मुलाचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या मुलाने त्याच्या वडिलांसाठी शूज आणले आहेत, मात्र या शूजची किंमत एकूण तुम्हीही अवाक् व्हाल.
यदुप्रियम मेहता नावाच्या व्लॉगरने आपल्या वडिलांना हे शूज गिफ्ट केले आहेत. सुरुवातीला यदुप्रियमच्या वडिलांनी हे बूट पाहून त्यांचं फार कौतुक केलं. हे बूट किती छान आहेत, मस्त दिसतायत वगैरे वगैरे प्रतिक्रिया दिल्यानंतर बुटांची किंमत ऐकून त्यांना धक्काच बसला. लेकाने विकत घेतलेल्या आणि सध्या आपल्या हातात असलेल्या बुटांची किंमत एकून त्यांनी चक्क हातच जोडले. कारण मुलाने आणलेल्या या शूजची किंमती थोडी थोडकी नसून तब्बल ४ लाख होती. बुटांची किंमत ४ लाख रुपये असल्याचं समजल्यानंतर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया ही फारच व्हायरल झाली आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – VIDEO: चोरीचा डाव फसला! पर्स चोरण्यासाठी बसमध्ये चढला; ड्रायव्हरने दरवाजाच बंद केला अन्
यदुप्रियमने वडिलांच्या हातात दिलेल्या बॉक्समध्ये नायकी कंपनीचे चंकी डंकी स्नीकर्स असतात. हे बूट पसंत पडल्यानंतर वडिलांनी उत्साहाने या बुटांची किंमत किती असं विचारलं. त्यावेळेस यदुप्रियमने हे बूट ४ लाखांचे आहेत असं सांगितलं तेव्हा वडिल काही क्षण आश्चर्याने या बुटांकडे पाहत राहिले. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलाकडे पाहत, “पागल हो क्या?” असा प्रश्न विचारला. आणि हात जोडले.