वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवणाऱ्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कोणी भररस्त्यात बाईकवर स्ंटट करताना दिसते तर कोणी धावत्या बाईकवर बसून डान्स नाहीतर अश्लील चाळे करताना दिसतात. सोशल मीडियावर काही लाईक्स आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी लोक स्वत:च जीव धोक्यात घालत असतात. दरम्यान सोशल मीडियावर आता एक नवा व्हिडीओ चर्चेत आला आहे. रील व्हिडीओ बनवण्यासाठी ज्यामध्ये ही व्यक्ती रील बनवण्यासाठी इतरांचा जीव धोक्यात घालून कसे धोकादायक स्टंट करत आहे हे दिसत आहे. दरम्यान हा या तरुणाला दिल्ली पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत दिल्ली पोलिसांनी याबाबत माहिती दिली.

रील बनवणाऱ्या तरुणाला दिल्ली पोलिसांनी शिकवला धडा

सार्वजनिक ठिकाणी रील व्हिडीओ बनवायला मनाई करण्यात आली असूनही काही लोक बिनधास्तपणे व्हिडीओ करताना दिसतात. दिल्लीतील GT रोडवरील हा व्हिडीओ आहे. व्हिडीओमध्ये दिसते की तरुणाने रस्त्याच्या मधोमध बाईक पार्क केली आहे. एवढंच नाही तर रस्त्यात खुर्ची टाकून हा आरामात बसलेला दिसत आहे. त्याच्या आजुबाजून भरधाव वेगाने गाड्या जात आहे. हा व्यक्तीच स्वत:सह इतरांचा जीव देखील धोक्यात टाकत आहे. या बेशिस्त तरुणाला दिल्ली पोलिसांना चांगलीच अद्दल घडवली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी या व्हिडिओची तात्काळ दखल घेतली आणि बाईक नंबरवरून विपिन कुमार या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. दिल्ली पोलिसांनी GT रोडच्या मधोमध मोटारसायकल उभी करून रील बनवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध मोटार वाहन कायदा आणि IPC च्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आणि मोटारसायकल आणि मोबाईल फोन जप्त केला. इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हेही वाचा –“मी तुम्हाला ५०० डॉलर देतो, तुम्ही मला नोकरी द्या”; तरुणाने थेट स्टार्टअप च्या फाउंडर्सला दिली भन्नाट ऑफर

हेही वाचा –Viral Vada Pav Girl चंद्रिका दीक्षितच्या अटकेबाबत दिल्ली पोलिसांनी केला खुलासा! वाचा, व्हायरल व्हिडीओचे सत्य

दिल्ली पोलिसांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये स्ंटट करणाऱ्या तरुणाला अटक केल्याचे दिसते आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यापासून तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओ आतापर्यंत १९९ पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट देखील केली आहे. व्हायरल व्हिडीओवर कमेंट करताना अनेकांनी दिल्ली पोलिसांच्या तत्पर कामगिरीचे कौतूक केले तर काहींनी आरोपीचा चेहरा झाकल्यामुळे पोलिसांवर टिका केली आहे.