Viral video: आत्महत्या हा अनेक दशके आपल्या समाजात दुर्लक्षलेला विषय राहिला आहे. सुशांत सिंग राजपूत, जिया खान, भय्यूजी महाराज अशा व्यक्तींच्या आत्महत्येनंतर गेल्या काही वर्षांमध्ये समाजात त्या विषयी थोडी चर्चा होऊ लागली आहे.कोविड-१९ नंतर वाढलेल्या ताणतणावांच्या पार्श्वभूमीवर वाढत्या आत्महत्या हा एक गंभीर सार्वजनिक प्रश्न म्हणून समोर येऊ लागला आहे. काही घटना इतक्या भयानक घडतात की त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी, काय लिहावं किंवा काय सांगावं ते सूचत नाही. अशाच एका तरुणीचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे.ज्यामध्ये एक मुलगी आपला जीव देण्याची धमकी देत आहे. त्यानंतर ती खरंच मेट्रो स्टेशनच्या छतावरुन उडी मारते. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खळबळ उडवत आहे.

हृदयाचा ठोका चुकेल

सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ समोर येत असतात. जे काहीच वेळात इंटरनेटवर तुफान व्हायरल होतात. यामध्ये विचित्र, मजेशीर ,धक्कादायक, भयानक, स्टंट अशा सर्वच प्रकारचे व्हिडीओ पाहिला मिळतात. असाच एक व्हिडीओ समोर आलाय ज्याला पाहून तुमच्याही हृदयाचा ठोका चुकेल.

नक्की काय घडलं?

हा व्हिडीओ नवी दिल्ली येथील एका मेट्रो स्टेशनचा आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुणी मेट्रो स्टेशनच्या छतावर उभी आहे. यावेळी ती खाली उडी मारण्याची धमकी देत आहे. या सर्व प्रकाराची माहिती मिळताच, घटनास्थळी पोलीसही उपस्थित असल्याचं दिसत आहे. उपस्थित सर्वच तिला मागे वळण्यासाठी विनंती करत आहेत. तसेच तिला समजवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र ही तरुणी कुणाचंही ऐकायला तयार नाही. एवढ्यातच ती खरोखर छतावरुन खाली उडी मारते.  

मुलगी उडी मारेपर्यंत खाली उभ्या असलेल्या लोकांनी एक चादर घेऊन तिला वाचवण्यासाठी पुढे करुन ठेवली होती. मुलीनं उडी मारली आणि ती थेट त्या चादरीत येऊन पडली. लोकांच्या या कृतीनं तरुणीचे प्राण वाचले

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> आश्चर्य! रस्त्यावर धावता धावता अचानक हवेत उडू लागली कार; पुन्हा पुन्हा पाहाल Video चा शेवट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा समोर आलेला व्हिडीओ @@CISFHQrs नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. २८ सेकंदाचा हा श्वास रोखणारा व्हिडीओ खूपच थरारक आहे. व्हिडीओवर भरपूर कमेंटही येत आहेत.