Hungary national with Ram devotees chant Ram bhajan ahead of ‘Pran Pratishtha’ : अयोध्येतील श्रीराम मंदिरात होणाऱ्या भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. या कार्यक्रमासाठी देशभरातील कलाकार, मान्यवर मंडळींना आमंत्रण देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. परंतु, या पूर्वीच देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पण, केवळ भारतीयच नाही तर परदेशातील नागरिकही श्रीरामाच्या भक्तीत तल्लीन झाल्याचे पाहायला मिळत आहेत. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातून नव्हे तर युरोपातील भाविकही अयोध्येत दाखल झाले आहेत. अशाच काही विदेशी राम भक्तांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
युरोपिय देश हंगेरीतून काही रामभक्त अयोध्येत पोहोचले आहेत. रामलल्लाच्या अभिषेकापूर्वी अयोध्येतील रस्ते राम भक्तांनी भरून गेले आहेत. यात हे हंगेरीतील रामभक्त नाचत, गात रामाचे भजन गाताना दिसत आहेत.
दरम्यान, एएनआयच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरून हा परदेशी रामभक्तांचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्यात हंगेरीतील एक रामभक्त इतर भाविकांबरोबर ‘रघुपती राघव राजा राम’ हे भजन गाताना दिसतोय. तो केवळ गातच नाही, तर नाचत रामभक्तीत तल्लीन झाल्याचेही दिसतेय. त्याची भजन गाण्याची स्टाइल सोशल मीडियावर आता खूप पसंत केली जात आहे. यावेळी इतर रामभक्त अगदी आनंदात त्याला भजनात साथ देताना दिसत आहेत.
अयोध्येतील राम मंदिरासारखीच ‘ही’ आहेत भारतातील ७ प्रसिद्ध राम मंदिरं, वाचा
दरम्यान, अयोध्या नगरीत सध्या मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळतेय. अनेक रामभक्त आपल्यापरीने या सोहळ्यात सहभागी होत आहेत. दुसरीकडे राम मंदिरात सजावट आणि अंतिम स्वच्छतेची लगबग सुरू आहे, तसेच मंदिरात पूजाविधीचे कार्यक्रम पार पडत आहेत. एकूणच राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अयोध्येसह देशभरात चैतन्याचे वातावरण पाहायला मिळतेय.