Desi jugad Viral video: भारतीय नागरिक कचऱ्यातून विश्व घडवण्यात चतुर असतात. एखादी वस्तू उपयोगी नाही, असे आपल्या देशात क्वचितच घडते. भारतात जुगाडू लोकांची काहीच कमतरता नाही. भारतीय लोक असे असे जुगाड शोधून काढतात की जे पाहून मोठमोठे इंजिनियर्स आपल्या डिग्र्या फाडतील. सोशल मीडिया विविध व्हिडिओंनी भरलाय. अनेक विनोदी व्हिडिओ आपण इथे रोज पाहत असतो. त्यातले काही व्हिडिओ आपल्याला खळखळून हसवतात. याच प्रकारात येतात जुगाडा व्हिडिओ. स्वत:च डोकं चालवून असं काहीतरी केलं जातं, की मग सोशल मीडियावरचे यूझर्स या जुगाडुंना डोक्यावर घेतात.
याआधी तुम्ही अनेक वेगवेगळे जुगाड पाहिले असतील मात्र यापेक्षाही खतरनाक जुगाड समोर आला आहे. एका तरुणानं चक्क लाल-हिरव्या मिरच्यांपासून दिवाळीची लायटिंग तयार केली आहे. . होय, तुम्हाला विश्वास बसत नाहिये? तर मग व्हायरल होणारा व्हिडीओ एकदा पाहाच..हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क होईल.
संपूर्ण देश सध्या दिवाळीच्या उत्सवात रंगला आहे. दिव्यांची रोषणाई, फटाक्यांचा आवाज आणि सोशल मीडियावरच्या पोस्ट्सचा धडाका – सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. याचदिवाळीनिमित्त एका तरुणानं जबरदस्त असा जुगाड केला आहे.या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एक व्यक्ती हिरव्या आणि लाल मिरच्या कापत आहे. सुरुवातीला काहीच समजत नाही की मिरच्या आणि दिवाळी लायटिंगचा काय संबंध? पण लगेचच लक्षात येतं की तो या मिरच्या लायटिंगच्या बल्बवर बसवल्याचा प्रयत्न करत आहे आणि जेव्हा लाइट सुरू होतात, तेव्हा त्या मिरच्या झगमगायला लागतात. त्याची ही एकदम हटके आणि विनोदी सजावट पाहून लोक आता चांगलेच थक्क झाले आहेत.
पाहा व्हिडीओ
जुगाड ही आम्हा भारतीयांची वेगळी कला आहे. अशातच एका तरुणाने जुगाडच्या मदतीने एक अनोखी लायटींग बनवली आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ही अनोखी लायटींग पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.