How Banana Leaf Plates Are Made: एखादं लग्न समारंभ असो, घरात सत्यनारायणाची पूजा असो केळीचे पान हे सामानाच्या यादीत आवर्जून असते. तसेच दक्षिण भारतीय रेस्टॉरंटमध्ये तुम्ही जेवायला गेला असाल तर तिथे सुद्धा केळीचे पान किंवा केळीच्या पानांपासून बनवलेल्या ताटांचा वापर केला जातो आहे. कारण प्लास्टिक किंवा, अधिक खर्चिक स्टाईलिश ताट वापरण्यासापेक्षा हा उपाय अगदीच उत्तम ठरतो. पण, तुम्ही कधी केळ्यांच्या पानांपासून कशाप्रकारे प्लेट्स बनवल्या जातात हे पाहिलं आहे का ? नाही… तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ; ज्यामध्ये या प्लेट्स कश्या बनवल्या जातात हे दाखवलं आहे.

व्हायरल व्हिडीओ दक्षिण भारतातील आहे. केळीच्या झाडावरील केळीची पाने काढून घेतली आहेत. त्यानंतर ताट (प्लेट्स) बनवण्यासाठी काही व्यक्ती सुरुवात करतात. त्यासाठी सगळ्यात पहिला केळीच्या पानांना चौरसाकृती आकार देण्यासाठी देठ, कडा कापून घेतल्या आहेत. नंतर आकार दिलेल्या केळीच्या पानांना, केळीच्या देठापासून निघालेल्या लांब पट्टीने बांधलं आहे आणि नंतर वर्तमानपत्रात गुंडाळून ठेवलं आहे. नक्की कशाप्रकारे प्लेट्स बनवल्या जात आहेत व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

हेही वाचा…Lion Cubs: ‘आम्ही चार भावंडं…!’ जंगलातील सिंहाच्या शावकांचा VIDEO; त्यांचा ‘हा’ फॅमिली फोटो पाहून तुमच्याही चेहऱ्यावर येईल हसू

व्हिडीओ नक्की बघा…

केळीच्या पानांच्या प्लेट्स :

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, वर्तमानपत्रात गुंडाळलेल्या केळीच्या पानांना प्लेटचा आकार देण्यासाठी एका व्यक्तीकडे सोपवलं आहे. ही व्यक्ती केळीच्या पानांच्या गठ्ठयावर जेवणाचे एक (स्टीलची)ताट ठेवते आणि गोलाकार केळीची पाने ताटाच्या साहाय्याने कापून घेते. तसेच केळीच्या पानाचा जास्तीचा भाग कापून बाजूला ठेवते आणि इथेच व्हिडीओचा शेवट होतो. अशाप्रकारे केळीच्या पानांपासून अशा खास प्लेट्स बनवल्या जात आहेत ; याची छोटी झलक पाहायला मिळाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @foodiee_sahab या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘अशा बनवल्या जातात दक्षिण भारतीय स्टाईलमधील केळीच्या पानांच्या प्लेट्स’ ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. हा व्हिडीओ पाहून एका नेटकाऱ्याने कमेंट केली आहे की, ‘जरी प्लेट्स वर्तुळात कापल्या नसत्या, तरी मी त्यांच्याकडून खाल्ले असते’, तर दुसरा युजर म्हणतोय की, ‘केळीच्या पानावर वाढलेलं जेवणाची चव खूपच वेगळी आहे’, तिसरा युजर म्हणतोय की, ‘ “प्लास्टिकच्या प्लेट्सपेक्षा चांगलं आणि खूप आरोग्यदायी आहे’ ; आदी अनेक कमेंट करण्यात आली आहे.