Video Viral : सोशल मीडियावर आई-वडील लहान मुलांचे अनेक गोंडस व्हिडीओ शेअर करीत असतात. काही व्हिडीओ थक्क करणारे असतात; तर काही व्हिडीओ पाहून पोट धरून हसायला येते. सध्या असाच एका चिमुकलीचा व्हिडीओ तिच्या आईने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आई तिला सरनेमचा अर्थ विचारते, तेव्हा चिमुकलीने सांगितलेला सरनेमचा अर्थ ऐकून तुम्ही पोट धरून हसाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये आई आणि छोट्या मुलीचे संभाषण दाखवले आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला आई चिमुकलीला विचारते, “सरनेमचा अर्थ काय?” त्यावर ती म्हणते “तुला माझ्या सरांचे नाव माहिती आहे? मला माझ्या सरांचे नाव माहिती आहे.” त्यावर आई पुन्हा विचारते, “बाळा सरनेमचा अर्थ काय?” त्यावर चिमुकली म्हणते, “मला सरनेमचा अर्थ माहीत नाही; पण सरांचे नाव माहीत आहे.. माझ्या सरांचे नाव सांगू? पनवेल सर.. ते पनवेलला राहतात. पनवेलच्या बाजूला”
आई आणि मुलीचे गोड संभाषण ऐकून तुम्हीही पोट धरून हसाल. व्हिडीओत असे दिसून येते की, चिमुकलीच्या मते, सरनेम म्हणजे सरांचे नाव आणि त्यावरूनच ती आईला तिच्या सरांचे नाव सांगते.

हेही वाचा : खेळता खेळता स्विमिंग पूलमध्ये पडली चिमुकली, धक्कादायक व्हिडीओ पाहून अंगावर येईल काटा

हा गोड व्हिडीओ चिमुकलीच्या आईने shwetapawarchorge या तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तुम्हाला माहिती होता का सरनेमचा खरा अर्थ?” या अकाउंटवर दिलेल्या माहितीनुसार या चिमुकलीचे नाव आरवी चोरगे आहे आणि ती ठाणे येथील रहिवासी आहे. आरवीचे असे अनेक व्हिडीओ यापूर्वीही या अकाउंटवरून शेअर करण्यात आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने मजेशीरपणे लिहिलेय, “खूप भारी… पनवेलला राहतात म्हणून पनवेल सर” तर एका युजरने लिहिलेय, “किती छान, मस्त व्हिडीओ.” आणखी एका युजरने लिहिलेय, “किती गोंडस मुलगी आहे.”