Pune Video : पुणे हे एक महाराष्ट्रातील सांस्कृतिक शहर आहे. या शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुण्यात दरवर्षा हजारो विद्यार्थी शिक्षण, नोकरी आणि व्यवसायासाठी येथे येतात. पुण्यात येणारा प्रत्येक जण पुण्याचा होऊन जातो. पुणे हे प्रेमात पडण्यासारखंच आहे. या शहरात येण्याऱ्या प्रत्येकाला हे पुणे हे आपलं वाटायला लागतं. सोशल मीडियावर पुण्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात.पुणेरी पाट्या, पुणेरी टोमणे, पुणेरी भाषा, खाद्यसंस्कृती आणि पर्यटने स्थळांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केली जातात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पुणे शहर दाखवले आहे. उंच आकाशातून पुणे शहर कसे दिसते, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये पुणे शहराचे चित्रिकरण केले आहे. ड्रोनद्वारे हा व्हिडीओ शुट केल्याचा अंदाज आहे. या व्हिडीओत दूरवरुन पुणे खूप सुंदर दिसत आहे. शनिवारवाडा सुद्धा स्पष्टपणे दिसतोय. हा व्हिडीओ पाहून कोणीही पुण्याच्या प्रेमात पडेल इतके अद्भूत दृश्य दिसत आहे. या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “प्रेमात पडण्यासारखंच आहे पुणे..” या व्हिडीओवर सुंदर मराठी गीत लावले आहे. “तुझ्या प्रेमात पडतोय पुन्हा पुन्हा स्वतःला हरवून बसलोय तुज्या प्रेमात झालोय खुळा..” अगदी मनाला मोहून टाकणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

हेही वाचा : Video : लग्नात मंगलाष्टके गाताना ब्राम्हणाचा सूर पाहून पाहूण्यांना हसू आवरेना, पाहा मजेशीर व्हायरल व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

iloovepune या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हळूवार जपून ठेवलेले क्षण, तेचे माझ्या जगण्याची आस आहे, एकेक साठवून ठेवलेली आठवण, तेच माझ्यासाठी खास आहे. लव्ह पुणे” तर एका युजरने लिहिलेय, “खूप काही दिले एका वर्षात पुण्याने” आणखी एका युजरने लिहिलेय, “आम्ही पुणेरी” अनेक युजर्सनी पुण्याविषयी प्रेम व्यक्त केले आहे. काही युजर्सनी हार्टेचे इमोजी शेअर करत प्रेमाचा वर्षाव केला आहे.