Shocking video: सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी मनोरंजक असतात. तर कधी हृदयाचे ठोके चुकवणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. हा व्हिडीओ मगरीचा व्हिडीओ आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे की मगर ही सगळ्यात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. मगरींमध्ये सिंहाचीही शिकार करण्याची शक्ती आहे. मात्र तुम्हाला आम्ही सांगितलं की एका कुत्र्याने मगरीवर हल्ला केला आहे तर… विश्वास बसत नाही ना पण हे खरंय. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका वस्तीत मगर अचानक येते यावेळी तिथे असलेला एक व्यक्ती मगरीला हकलवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यावेळी मगर त्याच्या तावडीतून सुटुन पाठी पळते, तेवढ्यात तिथे दोन कुत्रे येतात आणि मगरीला पकडण्याचा प्रयत्न करतात. एक कुत्रा तर मगरीचं तोंडच चावण्याचा प्रयत्न करतो. यावेळी तिथे असलेला व्यक्ती काठीने मगरीला पुन्हा हकलवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. कुत्र्यानं थेट मगरीशी घेतलेला पंगा पाहून सर्वच शॉक झाले आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> मी कशाला बंधनात राहू गं? गायीची बुद्धिमत्ता पाहून लोक थक्क; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ @earth.reel या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज गेले आहेत. तसेच नेटकऱ्यांनी व्हिडिओ पाहून विविध प्रतिक्रियाही दिल्या आहेत. “अपनी गली में कुत्ता भी शेर होता है हे आज पुन्हा सिद्ध झालं” अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.