Dog Biting Video: सोशल मीडियावर असंख्य डान्स व्हिडीओ पाहायला मिळतात. व्हायरल झालेल्या डान्स व्हिडीओंपैकी काही व्हिडीओ पाहिल्यावर डान्सरने घेतलेली मेहनत लक्षात येते. तर लग्नातले, वरातीमध्ये नाचतानाचे व्हिडीओ पाहून आपण पोट धरुन हसायला लागतो. चित्रविचित्र डान्स करणाऱ्यांचे व्हिडीओ आजकाल लगेच व्हायरल होतात असे म्हटले जाते. अशाच एका आगळ्या-वेगळ्या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा आहे. या व्हिडीओमध्ये डान्स करणाऱ्या व्यक्तीला एक कुत्रा चावत असल्याचे दिसते.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक तरुण शॉर्ट घालून रस्त्यावर नाचत आहे. नाचताना एक कुत्रा त्याच्या पायावर वेगवेगळ्या ठिकाणी चावत असल्याचे पाहायला मिळते. पण डान्स करणारा तो तरुण पायाला चावणाऱ्या कुत्र्याकडे दुर्लक्ष करतो. यामुळे कुत्रा पुन्हा-पुन्हा पायाजवळ जाऊन चावा घेतो. आपल्याकडे बिल्डींगच्या खाली, गल्लीमध्ये किंवा नाक्यावर असंख्य भटके कुत्रे पाहायला मिळतात. रात्रीअपरात्री बाहेर फिरणाऱ्यांवर हे कुत्रे भुंकत असतात. यातला एखादा कुत्रा आपल्याला चावेल या विचाराने अनेकजण रात्रीच्या वेळी घरातून बाहेर जाणं टाळतात. काहीजण तर कुत्रा दिसल्यावर तो चावेल या भीतीने पळू लागतात. पण या व्हिडीओमधील तरुण कुत्रा वारंवार चावत असतानाही नाचत आहे.

आणखी वाचा – सिंहीणीच्या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये लोकांनी केली गर्दी, केक आणल्यावर केला Prank; धडकी भरवणारा व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ पाहून नेटकरी अवाक् झाले आहे. व्हिडीओला असंख्य लाइक्स मिळाले आहेत. लोक हा व्हिडीओ इतरांना शेअर करत आहेत. व्हिडीओखाली कमेंट्सचा वर्षाव होत आहे. @einaldooi या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमधील डान्सरचे नाव रेनाल्डो सोरेस (Reinaldo Soares) असे आहे. तो एक व्हिडीओ क्रिएटर आहे. तसेच व्हिडीओमधील कुत्रा हा त्याने पाळलेला आहे असा अंदाज त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन लावला जात आहे. त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्या कुत्र्याबरोबरचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहू शकता. प्रत्येक व्हिडीओमध्ये तो कुत्रा रेनाल्डोच्या पायाचा चावा घेत असल्याचे दिसते.