Dog Crocodile Fight Video Viral : जसा सिंह जंगलातील सर्वांत आक्रमक, हिंसक प्राणी मानला जातो. तसे मगरीलाही पाण्यातील सर्वांत हिंसक प्राणी मानले जाते. मगर आपल्या ताकदीने सर्वांत मोठ्या प्राण्यांनाही आपली शिकार बनवते. जर पाण्यात मगरीने एखाद्या प्राण्याला आपली शिकार बनवले, तर त्या प्राण्याची मृत्यूशिवाय सुटका नसते. पण, सोशल मीडियावर सध्या असा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात रस्त्यावरील एका कुत्र्याने चक्क मगरीला दिवसा तारे दाखवले.

मगरीशी एकटा भिडला रस्त्यावरील कुत्रा

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावरील कुत्रा एका तलावाजवळ उभा असल्याचे दिसून येतेय. यावेळी तलावातून बाहेर आलेली एक महाकाय मगर एका माणसाच्या तावडीतून सुटते आणि हल्ला करण्याच्या उद्देशाने ती कुत्र्याकडे खूप वेगात धावत जाते. या परिस्थितीत घाबरण्याऐवजी कुत्रा चक्क मगरीवर जोरजोरात भुंकू लागतो. तसेच, मगर हल्ला करताच तोही तितक्याच आक्रमकपणे तिच्यावर प्रतिहल्ला करतो.

मगर आक्रमकपणे जबडा खोलून कुत्र्याची मान पकडणारच असते, तितक्यात कुत्राच मगरीचा जबडा तोंडाने फाडून काढतो. कुत्रा मगरीचा जबडा अशा प्रकारे पकडून ठेवतो, की मगर काहीही करू शकत नाही. यादरम्यान एक माणूस मगरीच्या मागून धावत येतो आणि मगरीचे तोंड एका पकडीच्या मदतीने दाबून ठेवतो. मगर आपल्या भक्ष्याला क्षणार्धात जबड्यात पकडून चिरडते; पण या व्हिडीओत मात्र उलट घडताना दिसतंय. कुत्र्याची चपळता आणि धाडसापुढे मगरीचं काहीच चाललं नाही. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून लोकही अवाक् झालेत.

कुत्र्याच्या धाडसाचे कौतुक

मगर आणि कुत्र्याच्या लढाईचा हा व्हिडीओ एक्सवर @Predatorvids नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे; तर अनेकांनी त्यावर कमेंट्स केल्यात. अनेकांनी या व्हिडीओत कुत्र्याच्या धाडसाचे कौतुक केले आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिलेय की, हा कुत्रा खरा सुपरहीरो आहे. तर दुसऱ्याने लिहिले की- आता ही मगर आयुष्यभर कुत्र्यांना घाबरत राहील.