पाळीव प्राणी असणाऱ्या घरांमध्ये रोज मजेशीर किस्से घडत असतात. ज्याप्रकारे या प्राण्यांना घरातील सदस्य समजुन प्रेम केले जाते त्याचप्रकारे तेदेखील घरातल्यांना जीव लावतात आणि त्यांच्यावर हक्क गाजवताना दिसतात. माणसांप्रमाणे हे प्राणीदेखील रुसून बसतात, चिडतात याचे अनेक गोंडस व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले आपण पाहतोच. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक कुत्रा त्याच्या मालकाच्या एका कृतीमुळे उदास झालेला दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये कुत्र्याशेजारी बसलेली व्यक्ती त्यांच्यासमोर असलेल्या मांजरीच्या डोक्यावरून हात फिरवताना दिसत आहे. मालकाला मांजरीचे लाड करताना पाहून हा कुत्रा उदास होऊन मालकाकडे पाहू लागतो, पण तरीही त्याला दुर्लक्षित केले जाते. हे पाहून तो अजुन उदास होतो. मांजरीबाबत वाटणारा मत्सर या कुत्र्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. व्हायरल होणारा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी शेअर करत त्याला हटके कॅप्शन दिले आहे. पाहा त्यांनी काय कॅप्शन दिले आहे.
आनंद महिंद्रांनी शेअर केलेला व्हिडिओ :
या व्हिडीओला आनंद महिंद्रा यांनी कॅप्शनमध्ये लिहले आहे, ‘कुत्र्याचे जीवन असे असते, अशी एक जुनी म्हण आहे. पण अशाप्रकारे दुर्लक्षित होणे किंवा एकटे पडणे ही माणसाची सगळ्यात मोठी भीती आहे. फक्त मलाच नाही तर अनेकांना या कुत्र्याला भेटावे असे वाटत असेल.’