गेल्या कित्येक दिवसांपासून प्रत्येकजण पावसाची आतुरतेने वाट पाहात होता. अगदी माणसांपासून प्राणी- पक्षी…..सर्वांच लक्ष पावसाच्या आगमनाकडे लागले होते. नाही नाही म्हणता अखेर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे आणि यंदाच्या मॉन्सुनची सुरुवात झाली आहे. पावसात भिजायला कोणाला आवडत नाही? धोधो कोसळणारा पावसात भिजण्याची मज्जा काही वेगळी असते नाही. कित्येकांनी पहिल्या पावसात भिजण्यांचा आनंद घेताना आपण पाहतो. आता माणसांनाच काय प्राण्यांना पावसात भिजण्याचा मोह आवरता आला नाही. पावसामध्ये भिजण्यासाठी माणसाइतकेच पशु-पक्षी देखील आतुर असतात हे दर्शविणारा हे व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होता आहे. व्हिडीओमध्ये एक कुत्रा पावसात भिजण्याचा आनंद घेताना दिसत आहे.

हेही वाचा – ”नवऱ्याच्या जीवावर बसून चालतं नाय”, पाणीपुरी विकणाऱ्या मराठमोळ्या काकूंचे विचार ऐकून तुम्हीही व्हाल थक्क! एकदा व्हिडीओ पाहाच

कुत्र्याने घेतला पावसात भिजण्याचा आनंद

व्हायरलव्हिडीओमध्ये धो धो कोसळणाऱ्या पावसामध्ये एक कुत्रा भिजण्याचा आनंद घेत आहे. या कुत्र्याला इतका आनंद झाला आहे तो अक्षरश: आनंदाने उड्या मारत आहे. पावसांच्या कोसळत्या सरींना पकडण्याचा निरागस प्रयत्न करताना तो दिसतो आहे. पावसामुळे साचलेल्या पाण्यात उड्या मारत हा कुत्रा भिजण्याची मज्जा घेत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर हसू आल्याशिवाय राहाणार नाही. व्हिडीओ पाहून तुम्हालाही पावसात भिजण्याची इच्छा नक्की होईल. मग वाट कसली पाहाताय….बिनदास्तपणे पावसात जा…मनसोक्त भिजा.

हेही वाचा – शरद पवार ते बाळासाहेब ठाकरे; महाराष्ट्राच्या नेत्यांचे AI अवतार पाहिले का? अमित वानखेडे यांनी तयार केले भन्नाट AI Photo

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, हा व्हिडीओ नक्की कुठला आहे याबाबत कोणतेही माहिती उपलब्ध नाही. दरम्यान लोकांनी व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने कमेंट केली आहे की, मुके प्राणी सुद्धा पावसासाठी तरसले होते…तर दुसऱ्याने लिहले की, याला म्हणतात खरा आनंद.