Dog sits on auto driver’s lap: कुत्रा हा मानवाचा मित्र आहे असे आपण नेहमीच ऐकत असतो. कुत्रे आपल्या मालकांसाठी काहीही करायला तयार असतात. श्वानप्रेमी लोक देखील या प्राण्याला घरातील सदस्याप्रमाणे वागवत असतात. आजकाल कुत्रे पाळणाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर देखील कुत्र्यांचे असंख्य व्हिडीओ पाहायला मिळतात. हे व्हिडीओ पाहताना आपण कधी-कधी पोट धरुन हसायला लागतो. तर काही व्हिडीओ पाहून भावूक व्हायला होतं. इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये एक रिक्षावाला आपल्या कुत्र्याचे लाड करत असल्याचे पाहायला मिळते.

या व्हिडीओमध्ये बंगळुरूमधील एक सर्वसामान्य दिवस असे लिहिलेले आहे. यावरुन हा व्हायरल व्हिडीओ बंगळुरू शहरातला आहे असा अंदाज लावला जात आहे. यात ट्रॉफिकमुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी दिसते. गर्दीत एका बसच्या बाजूला एका रिक्षामध्ये चालकाच्या मांडीवर कुत्रा बसलेला असल्याचे पाहायला मिळते. यावरुन त्या रिक्षा चालवणाऱ्या व्यक्तीचा तो पाळलेला कुत्रा आहे असे समजते. व्हिडीओ सुरु झाल्यावर कॅमेरा त्या रिक्षावर फोकस होतो. तेव्हा रिक्षा चालक स्टेअरिंगजवळ ठेवलेल्या कपड्याने स्वत:चे हात पुसताना दिसतो. पुढे तो मांडीवर बसलेल्या कुत्र्याचं डोक आणि अंग देखील पुसायला लागतो. त्यानंतर तो कुत्र्याला काहीतरी सांगत आहे असे दिसते.

आणखी वाचा – ८ कोटी कमाई, २५ मिलियन फॉलोवर्स; माणसाला फेल करेल ‘ही’ Influencer; व्हिडीओमध्ये काय करते पाहाच!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही सेकंदांसाठींचा हा व्हिडीओ पाहिल्यावर आपसूकच चेहऱ्यावर स्मितहास्य येते. @alka_itis या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा गोड व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओला २.५ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. शिवाय ४ लाखांपेक्षा जास्त यूजर्सनी व्हिडीओ लाइक केला आहे. बऱ्याचजणांनी हा व्हिडीओ इतरांना शेअर केला आहे. व्हिडीओखाली कमेंट नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. अनेकांनी त्या रिक्षा चालकाच्या श्वानप्रेमाचे कौतुक केले आहे.