Smart Dog Vs Leopard: सध्या जंगली प्राण्यांचे मानवी वस्त्यांमध्ये प्रवेश करण्याचे प्रमाण फार अधिक प्रमाणात वाढले आहे. अनेक ठिकाणी शहरी भागातही बिबटे संचार करत असल्याच्या घटना घडत आहेत. रात्रीच्या अंधारात शिकारासाठी बाहेर पडलेला बिबट्या अचानकच उत्तराखंडमधील अल्मोडा येथील पोलिस लाईनमधील क्वार्टर गार्ड परिसरात दाखल झाला. तिथं एका झाडाजवळ निवांत बसलेल्या कुत्र्यावर त्याने दबक्या पावलांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण, या वेळी “डॉगेश भाऊ”सुद्धा कमी नव्हते. याच बिबट्यावर चक्क एक कुत्रा भारी पडला. होय, हा बिबट्या एका कुत्र्याची शिकार करण्यासाठी शहरात शिरला होता, पण कुत्र्याने काय केलं पाहा. त्यानी या बिबट्याची काय अवस्था केली हे आता तुम्हीच पाहा…
संपूर्ण घटना परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून, अल्मोड़ा पोलिसांनी हा १७ सेकंदांचा थरारक व्हिडीओ १६ जून रोजी त्यांच्या अधिकृत X (Twitter) हँडलवर शेअर केला आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.
काय घडलं नेमकं?
व्हिडीओमध्ये दिसतं की, एक बिबट्या शिकार करण्यासाठी शहरात शिरला होता, तेवढ्यात त्याला एक कुत्रा दिसला. मग काय, बिबट्यानं पूर्ण शक्तीनिशी त्या कुत्र्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचीच फजिती झाली. घडलं असं की, एक कुत्रा झाडाजवळ बसलेला असतो. तेवढ्यात दबक्या आवाजात बिबट्या जवळ येतो. पण, कुत्र्याची नजर त्याच्यावर जाते आणि तो क्षणाचाही विलंब न करता घराच्या दिशेने धाव घेतो. विशेष म्हणजे तो काही सेकंदांनी परत येऊन खात्री करतो की तो खरोखर बिबट्या होता का; खात्री होताच तो पुन्हा आत पळून जातो.
बिबट्या काही पावलं पुढे येतो, पण परिसरात उजेड असल्याने तो फारसा धोका पत्करत नाही आणि जंगलाच्या दिशेने माघारी वळतो. कुत्र्याच्या चपळतेमुळे बिबट्याला माघारी जावे लागते. या घटनेमुळे लोकांनी कुत्र्याच्या स्फूर्ती आणि बुद्धिमत्तेचं कौतुक केलं आहे.
पोलिस प्रशासनाची खबरदारीची सूचना
अल्मोडा पोलिसांनी पोस्टमध्ये नागरिकांना आवाहन केलं आहे की, “उशिरा रात्री किंवा पहाटेच्या सुमारास घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्या. या भागात वन्यप्राण्यांचा वावर अधिक असल्यामुळे सतर्क राहणं गरजेचं आहे.”
येथे पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर तुफान प्रतिक्रिया
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हजारो लोकांनी तो शेअर केला असून, “डॉगेश भाई स्मार्ट निघाले!”, “कुत्र्याने स्वतःला वाचवलं, अनेकांनी म्हटलं, “शिकारी आला होता, पण शिकार टळली!”, अशा मजेदार प्रतिक्रिया येत आहेत.