Viral video: चहा म्हणजे भारतीयांचा जीव की प्राण, सकाळची सुरूवात चहाने आणि संध्याकाळची वेळही चहाने सुंदर केली जाते. त्याचमुळे चहा हे भारतीयांचे सर्वात आवडते पेय आहे. म्हणूनच अब्जाधीश असलेल्या बिल गेट्स यांनाही भारतीय चहाची भुरळ पडली आणि त्यांनी चहासोबत एका चहा विक्रेत्याचंही कौतुक केलं. बिल गेट्स यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि त्याच व्हिडीओमुळे डॉली चहावाला मात्र भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. गेल्या १६ वर्षांपासून डॉली नागपुरमध्ये चहाचा स्टॉल लावत आहे. अनेक सेलिब्रिटी डॉलीच्या चहाचे चाहते आहेत. डॉलीच्या टपरीवर असे अनेक सेलिब्रिटी चहा प्यायला येतात. दरम्यान डॉली चायवाल्याचा पुन्हा एकदा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, यामध्ये डॉली चायवाल्यानं आता चक्क दुबईमध्ये त्याचं ऑफिस सुरु केलंय. त्यामुळे आता डॉली चायवाला आता दुबईतच सेटल होणार का अशा चर्चा रंगत आहेत.

डॉली चायवाल्याचा नागपुरातील एका छोट्या चहाच्या स्टॉलपासून ते दुबईत आता स्वत:चं ऑफिस हा प्रवास थक्क करणारा आहे. गेल्या महिन्यात डॉली चायवाल्याच्या ऑफिससच्या उद्घाटनाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये डॉली, ज्याचे खरे नाव सुनील पाटील आहे, दुबईतील एका आलिशान खोलीतून काम करताना दिसत आहे. डॉली चायवाल्याची चहा विकण्याची, बनवण्याची अनोखी शैली लोकांना खूप आवडते. आता बातमी अशी आहे की डॉली चायवाला लवकरच त्याच्या दुबईतील ऑफिसमध्ये शिफ्ट होणार आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये डॉली चायवाला दुबईतील त्याच्या ऑफिसमध्ये बसला आहे आणि एक व्यक्ती त्याला विचारते की सर्व ओके आहे का? यानंतर डॉली चायवाला त्याच्या खुर्चीवर बसून हो हो असं म्हणतो. त्यानंतर डॉली लवकरच नागपूर सोडून दुबईला शिफ्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर असलेल्या नागपूरमध्ये डॉली चायवालाची एक वेगळी ओळख आहे. या व्यक्तीने १०वी नंतर शिक्षण सोडले आणि गेल्या १६ वर्षांपासून नागपुरातील सिव्हिल लाईन्सजवळ चहाचे दुकान चालवत आहे. डॉली चायवालाच्या चहाच्या स्टॉलवर जो कोणी चहा प्यायला येतो तो तिची स्टाईल आणि चव दोन्हीचा चाहता होतो. मात्र, बिल गेट्स यांनी त्याच्या टपरीवर चहा घेतला तेव्हापासून मात्र डॉली चायवाला अधिकच प्रसिद्ध झाला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> प्रवाशांनो सावधान! दादर स्टेशनवर चोरांचा सुळसुळाट; रंगेहात पकडताच ब्लेड काढलं अन्…धक्कादायक VIDEO पाहाच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. यानंतर यूजर्स व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका यूजरने लिहिले… ज्या ठिकाणाहून प्रसिद्ध झाले ते ठिकाण सोडणे योग्य नाही. आणखी एका यूजरने लिहिले… नागपूरने तुम्हाला प्रसिद्ध केले आहे, तुमचा दुबईशी काय संबंध आहे. तर दुसऱ्या युजरने लिहिले… खूप प्रगती करा भाऊ, लोक काय म्हणतात याकडे लक्ष देण्याची गरज नाही.