राज्यातील महिलांची आर्थिक अडचण दूर करताना नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली. राज्यभरातून या योजनेला तुफान प्रतिसाद मिळाला. लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकारवर टीका करताना राज्यातील भावांनी काय गुन्हा केलाय? असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला होता. त्यामुळे लाडका भाऊ योजनाही अंमलात आणली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात जाहीर केलं. बेरोजगार तरुणांसाठीही सरकारने युवा कार्य प्रशिक्षण योजना कार्यान्वित केली आहे. याच योजनेला माझा लाडका भाऊ योजना असं संबोधलं जात आहे. दरम्यान लाडकी बहीण आणि लाडका भाऊ नंतर आता काही लग्नाळू लोकांनी सरकारकडे नवी मागणी केली आहे. एका तरुणाने हातात पोस्टर घेऊन सरकारकडे अजब मागणी केली आहे. तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अनेक तरुणांचे वय उलटत चालले तरी लग्न जुळत नसल्याने अनेकजण चिंतेत आहे. मुलांच्या किंवा मुलींच्या अपेक्षा जुळणे, शिक्षण-नोकरी, घरची परिस्थिती आणि वैचारिक मतभेद अशा अनेक कारणांमुळे अनेकांची लग्न रखडली आहेत. दरम्यान कित्येक तरुणांना चांगली नोकरी नाही किंवा मुलगी नोकरी करत नाही म्हणून लग्न मोडल्याचे किंवा जुळत नाही अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थिती या लग्नाळू लोकांनी आता सरकारकडे मदतीची धाव घेतली आहे.

हेही वाचा – पुण्यात पावसाचा कहर! प्रसिद्ध भिडे पूल गेला पाण्याखाली, पाहा Video Viral

व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण हातात पाटी घेऊन उभा असलेला दिसतो आहे. त्याच्य पाटीकडे पाहून लोकांना हसू आवरत नाहीये. व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला आम्ही लग्नाळू हे गाणे ऐकू येत आहे. तरुणाच्या हातातील पोस्टरवर “लग्नाचं टेन्शन नको घेऊ, आपण सरकारला विनंती करू लाडकी सून आणि लाडका जावई योजना चालू करा” अशी मागणी केली आहे.

हेही वाचा – पुण्यातील ऐतिहासिक पेशवे कालीन कात्रजचा तलाव ओव्हरफ्लो; पाहा Viral Video

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडिओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. इंस्टाग्रामवर yeda_dipuuu नावाच्या पेजवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून लोकांनी भरभरून कमेंट केल्या आहेत. व्हिडीओवर कमेंट करताना एकाने लिहिले की,”बरं झालं म्हणजे पुढच्या वर्षी भाऊच लग्न नक्की” दुसरा म्हणाला,”दादांना सध्याच्या सरकारची परिस्थिती आणि आपल्या राज्यात लग्नाची परिस्थिती एकदम छान पद्धतीने मांडलेली आहे.” तिसरा म्हणाला, ”खरं भाऊ, वय ४० झालं तरी मुलगी मिळेना कधी होणार लग्न? का एकटाच राहतो आता काय माहिती़. आता तरी देवा मला पावशील का?”