Viral video: ‘नाकीचा मोती ठेवी गहाण, राखी जावयाचा मान!’ या मराठीतल्या म्हणीप्रमाणे सध्या सोशल मीडियावर जावयासाठी करण्यात आलेला अनोख्या मानपानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.जावयाचा मानसन्मान, कौतुक यात काही वावगं नाही. मात्र सध्या समोर आलेला व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. जावईबापू रुसू नये म्हणून सासरच्या मंडळींनी काय केलं हे तुम्ही या व्हायरल व्हिडीओ मध्येच पाहा.

लग्नसोहळा हा जीवनातील अनमोल क्षण, यातील मंगलमय क्षणाच्या आठवणी कायमस्वरूपी जतन करण्यासाठी लग्नकार्यात वेगवेगळे फंडे वापरले जातात.लग्न कार्य म्हटलं की मानपानात कार्य ही एक सामाजिक प्रथाच झाली होती. मग करवलीपासून तर जावयापर्यंत आणि नेत्यापासून कार्यकर्त्यांपर्यंत मानपान दिला जातो.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हायवेवरील हा व्हिडीओ असून एका गाडीच्या पाठिमागच्या काचेवर नवरदेवाचे दाजी अशी पाटी लिहली आहे. जावयांच्या मानपानाची पुरेपुर काळजी घेतल्याचं यामध्ये दिसत आहे. नेटकऱ्यांनाही कल्पना आवडली असून नेटकरी व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> मातृत्वाची ताकद! नुकत्याच जन्मलेल्या बाळाचा आणि आईचा VIDEO का होतोय व्हायरल? एकदा पाहाच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकही आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण चर्चा करत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर @coach_gurumaan नावाच्या वापरकर्त्याने शेअर केला आहे, ज्याला आतापर्यंत ९० हजाराहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.