Trending Video: जर एखादा प्राणी शांत असेल तर त्याला कधीही इतका त्रास देऊ नये की त्याला त्याचे रौद्र रुप दाखवावे लागेल. असे म्हणतात हत्ती अत्यंत शांत प्राणी आहे पण चिडल्यानंतर त्याच्यापुढे कोणीही टिकू शकत नाही. एका हत्तीला काठीने मारणे एका व्यक्तीच्या जीवावर बेतले आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका हत्ती त्याच्या मालकाच्या अत्याचारामुळे इतका अस्वस्थ झाला की त्याने त्याच्या मालकाला ठार मारले. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून धक्का पोहचू शकतो.

हत्तीने मालकाला पायाखाली तुडवले

वास्तविक, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक हत्ती एका व्यक्तीला पायाखाली तुडवताना दिसत आहे. पण यामागील कारण जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. ही व्यक्ती हत्तीला लोखंडी रॉडने मारताना दिसत आहे. सुरुवातीला हत्ती पूर्णपणे शांत उभा राहून हे सर्व सहन करत होता. पण शेवटी हत्तीने आपला धीर गमावला आणि आपल्या मालकाला जोरात ढकलून दिले. यानंतर हत्तीने त्या व्यक्तीला मरेपर्यंत पायांखाली तुडवतो. पायदळी तुडवताना हत्ती त्या व्यक्तीला आपल्या सोंडेत उचलून घेतो आणि त्याला खाली पाडतो. अशा परिस्थितीत आजूबाजूचे लोक त्याला वाचवण्यासाठी येतात तोपर्यंत ती व्यक्ती मेलेली असते. ही घटना करहाळ येथील असल्याची माहिती आहे. मरण पावलेली व्यक्ती हत्तीची काळजी घेणारी होती आणि त्या वय ६२ वर्ष होते.

हेही वाचा – “आ बैल मुझे मार!”, चिडलेल्या गायीसमोर बाईक थांबवून व्यक्तीने केली मोठी चूक, पुढे जे घडलं…..पाहा थरारक Viral Video

हेही वाचा – दुचाकीवरील महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन ओढून चोरटा फरार, थरारक घटनेचा Video Viral

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

@TheShivaJatt नावाच्या X खात्यावरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत हजारो वेळा पाहिला गेला आहे आणि अनेकांनी व्हिडिओला लाईक देखील केले आहे. अशा परिस्थितीत युजर्स व्हिडीओबाबत त्यांच्या प्रतिक्रियाही देत आहेत. एका यूजरने लिहिले, “हत्ती हा अतिशय शांत प्राणी आहे, पण तो खूप शक्तिशाली देखील आहे.” दुसऱ्या युजरने लिहिले,”प्राणी हे प्राणी असतात, त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवू नये.” तर दुसऱ्या यूजरने लिहिले,”जंगली प्राणी घरात ठेवले जातात, यापेक्षा मूर्खपणा काय असू शकतो.”
\