Viral Post : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ही संस्था बालभारती नावाने ओळखली जाते. बालभारती इयत्ता पहिली ते सातवीसाठी पाठ्यपुस्तके प्रकाशित करते. सध्या सोशल मीडियावर सध्या एका बालभारतीच्या इयत्ता पहिलीच्या पुस्तकाची जोरदार चर्चा सुरू आहे. या पुस्तकामध्ये एका कवितेत चक्क इंग्रजी शब्द वापरले आहेत. मराठी भाषा शिकवताना मराठी शब्द का वापरत नाही, असे प्रश्ने युजर्स विचारताहेत. लोक यावर टीका करताना दिसून येत आहे.

काय आहे प्रकरण?

बालभारतीच्या इयत्ता पहिलीच्या पुस्तकात एक कविता आहे. या कवितेचे नाव आहे “जंगलात ठरली मैफल” या कवितेच्या शेवटच्या ओळीमध्ये लिहिलेय, “वन्समोअर, वन्समोअर झाला शोर!” वन्समोअर हा इंग्रजी शब्द मराठी भाषेच्या पुस्तकातील कवितेत वापरल्यामुळे सोशल मीडियावर युजर्सनी नाराजी व्यक्त केली आहे.

जंगलात ठरली मैफल (कविता)

“जंगलात ठरली नाचगाण्याची मैफल अस्वल म्हणालं, ही तर हत्तीची अक्कल,
तबल्यावर होती कोल्होबाची साथ वाघोबा म्हणाले, नाही ना बात ?
पेटी मी किती वाजवतो सुंदर हसत हसत म्हणाले साळींदर.
गुंडू-पांडू लांडग्यांना तंबोऱ्याची हौस संतूर वाजवू म्हणाले चिकीमिकी माऊस !
मुंगीने लावला वरचा सां आवाज आवाज ओरडला ससा.
ठुमकत नाचत आला मोर वन्समोअर, वन्समोअर झाला शोर !”

पाहा पोस्ट, येथे क्लिक करा

https://www.facebook.com/share/p/TfRDXsKHoxPDjnfu/

बालभारती इयत्ता तिसरीच्या पुस्तकातील कविता होत आहे ट्रोल,
बालभारती इयत्ता तिसरीच्या पुस्तकातील कविता होत आहे ट्रोल

हेही वाचा : VIDEO: दागिने घातले, हाराने सजवले अन् केकऐवजी ठेवलं हे समोर; सोंड हलवत धन्यवाद म्हणणाऱ्या ‘हत्ती अखिला’च्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन पाहा

Sandeep Joshi यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून या संदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये या कवितेचा फोटो शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिलेय, “हे आहे महाराष्ट्र शासनाचे बालभारतीचे इयत्ता पहिली चे पुस्तक. कवितेच्या ओळीमध्ये लिहिलं आहे ‘वन्स मोर वन्स मोर झाला शोर..’ किमान मराठी भाषा शिकवताना मराठी शब्द वापरायला हवेत असं वाटत नाही का? तुमचे मत काय?”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पोस्टवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी संताप व्यक्त केला आहे. एका युजरने लिहिलेय, “मला देखील ही कविता वर्गात शिकवताना अतिशय वाईट वाटले होते मी देखील जिल्हा परिषद ला एक शिक्षिका आहे पण आजकाल बालभारतीच्या पुस्तकातील कविता अतिशय हलक्या दर्जाच्या असतात ,आमच्या वेळी ज्या प्रकारे कविता सुंदर आणि प्रसिद्ध महान कवींच्या असायच्या तशा आजकाल पाहायला नाही भेटत अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी काहीही कविता लिहून घेतल्या जातात आणि त्या आम्हाला शिकवावे लागतात काय करावे” तर एका युजरने लिहिलेय, “माऊस आणि शोर हे तरी काय मराठी शब्द आहेत काय.. याबद्दल बालभारती च्या अधिकृत संकेस्थळावर जाऊन आपण तक्रार नोंदवू शकतो ज्याची दखल घेतली जाते. मी सुद्धा बालभारती च्या पाठ्यपुस्तक मंडळात लेखक म्हणून काम केले आहे त्यावरून सांगते.” आणखी एका युजरने लिहिलेय, “निदान पुस्तकात तरी मराठीचा मान ठेवा. शक्यतो मराठीच शब्द वापरावेत”