Viral Video : असं म्हणतात, भारतात जुगाड करणाऱ्यांची कमतरता नाही. जुन्या वस्तूंपासून नव्या वस्तू बनविणे किंवा ट्रिक वापरून जुन्या वस्तूंचा वापर करणे यालाच जुगाड म्हणतात. सोशल मीडियावर जुगाडचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात.सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने स्कुटरचा असा उपयोग केला आहे की तुम्हीही चक्रावून जाल. या व्यक्तीने या स्कुटरचा ज्याप्रकारे उपयोग केला, त्याचा कोणीही विचार करू शकत नाही. सध्या या व्हिडीओची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे.

स्कुटरचा असा उपयोग कधी केला का?

Jugaad Video
Jugaad Video : फक्त एका कांद्याच्या मदतीने घरातील डास पळवा, पाहा हा सोपा जुगाड; व्हिडीओ होतोय व्हायरल
pfizer whistleblower
“मी आत्महत्या करणार नाही, जीवाचं बरंवाईट झाल्यास..”, फायजरच्या व्हिसल ब्लोअर मेलिसा यांचा व्हिडीओ व्हायरल
Sachin Tendulkar Bandra House Neighbor Dilip Dsouza complaints
सचिन तेंडुलकरच्या मुंबईतील शेजाऱ्याने केली तक्रार; म्हणाला, “तुझ्या घराबाहेर इतका..”, लोकांनी दिला पाठिंबा, प्रकरण काय?
Bajaj Auto launched Pulsar NS400Z
VIDEO : मार्केटमध्ये आता बजाजचा बोलबाला! आणली नवी दमदार पल्सर; फीचर्स पाहून व्हाल थक्क, किंमत…
a man do something crazy on traffic signal by watching video you can not control laughing
“दारू प्यायली का?” ट्रॅफिक सिग्नलवर व्यक्तीने असे काही केले की तुम्हालाही हसू आवरणार नाही, VIDEO होतोय व्हायरल
Bansuri Swaraj underlines this message My mother’s daughter
सुषमा स्वराज यांचेच माझ्यावर संस्कार, तुमच्या अपेक्षा पूर्ण करणार; बन्सुरी स्वराज यांची भावनिक साद
Riding scooter without helmet
ट्रॅफिक पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी तुम्ही ‘असा’ अतरंगी जुगाड कधी केलात का? व्हायरल व्हिडीओ पाहून पोट धरुन हसाल
Solar Ac That Does Cooling at Home Using Sun Energy Cost of Ac for 1 to 1.5 Ton
सोलार एसी वापरून सूर्यावर खेळ रिव्हर्स कार्ड! किंमत, फायदे पाहाच, आधीच घरी एसी असल्यासही करू शकता जुगाड

तुम्ही आजवर स्कुटरनी लोकांना प्रवास करताना पाहिले असेल पण हा जुगाड पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी स्कुटरचा उपयोग करताना दिसत आहे. तुम्हाला वाटेल, इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी स्कुटरचा उपयोग कशासाठी करणार? या व्हायरल व्हिडीओत तु्म्हाला दिसेल की स्कुटरच्या मदतीने ही व्यक्ती सामान इमारतीच्या वरच्या मजल्यावर पोहचवत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की व्यक्तीने स्कुटरचे मागील चाक बाहेर काढले आहे आणि तिथे लोहाचा रॉड टाकला आहे. या रॉडला त्याने दोरी बांधली आहे. जेव्हा व्यक्ती अ‍ॅक्सीलेटर वाढवतो तेव्हा दोरी फिरते आणि सामान वरती जाते. हा अनोखा जुगाड पाहून कोणीही थक्क होईल. सध्या या व्हिडीओची सगळीकडे चर्चा सुरू आहे.

हेही वाचा : मुलीचे कपडे घालून गर्ल्स हॉस्टेलमध्ये शिरला मुलगा अन् रंगेहाथ पकडला; पुढे काय झाले, पाहा VIDEO

पाहा व्हायरल व्हिडीओ

@HasnaZaruriHai या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “बजाजनी सुद्धा कधी विचार केला नसेल की स्कुटरचा असा उपयोग केला जाईल”
या व्हिडीओवर अनेक युजरने प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हे टॅलेंट भारताबाहेर जाऊ नये” तर एका युजरने लिहिलेय, “याला म्हणतात जुगाड”