सोशल मीडियावर एका महिलेच्या नोकरीची जोरदार चर्चा सुरु आहे, कारण तिला कोणतही अनुभव नसताना तब्बल महिना ३ लाखांहून अधिकच्या पगाराची नोकरी मिळाली आहे. ४८ वर्षांच्या एका महिलेला इतक्या पगाराची नोकरी मिळाली आहे, जी अनेकांना खूप प्रयत्न करुनही मिळत नाही. शिवाय ती महिला लाइव्ह स्ट्रीम प्लॅटफॉर्मवर होस्ट बनली आहे. या प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन गेम खेळले जातात. ही गेम एका वेळी चार लोक एकत्र येऊन खेळतात. हे प्रकरण चीनचे असून हा खेळ तिथे खूप लोकप्रिय आहे.

साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, या नवीन स्ट्रीमिंग होस्ट करणाऱ्या महिलेचे नाव वांग असे आहे. ती सिचुआन प्रांताची रहिवासी आहे. जेव्हा तिने महजोंग लाइव्ह स्ट्रीम होस्टसाठी नोकरीची जाहिरात पाहिली तेव्हा तिला माहित होते की, ती इथे अप्लाय करू शकते. कारण तिने या खेळात प्रभुत्व मिळवले आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, वांग म्हणते, ‘निकाल माझ्या अपेक्षेपलीकडचा होता, याचा मला खूप आनंद आहे.”

हेही पाहा- परदेशातून येताच पतीने दिला पत्नीला घटस्फोट, संसार वाचवण्यासाठी जिवाच्या आकांताने ओरडणाऱ्या महिलेचा VIDEO VIRAL

हातांचे सौंदर्य महत्त्वाचे –

कंपनीने जाहिरातीत लिहिले होते, “कोणत्याही विशेष शैक्षणिक पार्श्वभूमीची आणि अनुभवाची आवश्यकता नाही, फक्त अर्जदारांना गेम कसा खेळायचा हे माहिती पाहिजे. तसेच कंपनीने सांगितले की, कॅमेरामध्ये फक्त होस्टचे हात दिसतील. त्यामुळे होस्ट दिसायला सुंदर नसली तरी चालेल. मात्र, तिचे हात सुंदर असले पाहिजेत. तसेच होस्टकडे मॅनिक्युअर असणं आवश्यक आहे. शिवाय होस्टचा आवाजही चांगला असावा.” तसेच ऑनलाइन लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी, कसे बोलावे हे माहिती असणं आवश्यक आहे, असंही कंपनीच्या जाहिरातीमध्ये लिहिलं होतं.

हेही पाहा- Chandrayaan 3 च्या यशस्वी लँडिंगसाठी नेटकऱ्यांच्या मजेदार शुभेच्छा, व्हायरल मिम पाहून हसू आवरणं होईल कठीण

वांगने सांगितलं की, मला आढळले की माझी पात्रता नोकरीच्या अटींशी मिळती जुळती होती. शिवाय माझ्याकडे महजोंगचे प्रमाणपत्रही होते. त्याने एचआर मॅनेजरची मुलाखत घेतली होती आणि कंपनीच्या बॉसशीही संभाषण केले. त्यानंतर दोन दिवसांनी मला नोकरीची ऑफर मिळाली.