एका व्यक्तीने स्वयंपाकाच्या मोठ्या भांड्यांमधलं काही अन्न काढून त्यावर फुंकर मारल्याचा आणि पुन्हा त्याच भांड्यात अन्न मिसळल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून, नेटीझन्सने त्या व्यक्तीने फुंकर नाही तर अन्नावर थुंकल्याचा दावा केला आहे. व्हिडीओमध्ये मुस्लिम समुदायाने आयोजित केलेला लंगर दिसत आहे. कार्यक्रमस्थळी कॅमेरामन उपस्थित होते आणि भांड्यात अन्न मिसळल्यानंतर लोक “अमीन” म्हणताना ऐकू येतात. व्हिडीओ शेअर करणाऱ्यांमध्ये भाजप सदस्या प्रिती गांधी यांचाही समावेश आहे.
हा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होताच नेटीझन्सने व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करत या घटनेविषयी आपली मत नोंदवायला सुरुवात केली. पण नक्की मौलाना अन्नावर का थुंकत होते ?
( हे ही वाचा: Video: …अन् पद्म पुरस्कार सोहळ्यामध्ये त्यांनी पंतप्रधानांसमोरच राष्ट्रपतींची दृष्ट काढली )
व्हिडीओमध्ये चित्रित केलेला विधी काय आहे?
अल्ट न्यूजने उल्लाल काझी फजल कोयम्मा टांगल यांचे सहकारी हाजी हनीफ उल्लाला यांच्याशी चर्चा केली. अल्ट न्यूजच्या मते काझी हे व्हिडीओमध्ये अन्नावर फुंकर मारताना दिसत आहेत. केरळमधील ताजुल उलामा दर्गाहमध्ये ६ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत साजरा करण्यात आलेल्या उर्सच्या निमित्ताने लंगर आयोजित करण्यात आल्याची माहिती उल्ला यांनी दिली. ताजुल उलामा, ज्यांच्या नावावर दर्ग्याचे नाव आहे, ते केरळमधील एक सुन्नी मुस्लिम विद्वान होते ज्यांचे पूर्ण नाव असय्यद अब्दुल रहमान अल-बुखारी होते परंतु ते उल्लाल थांगल या नावाने प्रसिद्ध होते. उल्लाल थांगल यांचे फेब्रुवारी २०१४ मध्ये निधन झाले. अरबी दिनदर्शिकेनुसार त्यांची पुण्यतिथी नोव्हेंबरमध्ये येते. उर्स हा धार्मिक प्रमुखाच्या पुण्यतिथीला साजरा केला जाणारा तीन दिवसांचा कार्यक्रम आहे. जो सुफी सुन्नी मुस्लिम पाळतात.
( हे ही वाचा: वनप्लस फोन पुन्हा फूटला ! युजरच्या मांडीला झाली जबर जखम; जाणून घ्या बॅटरीचा स्फोट का होतो? )
“जेवण तयार झाल्यानंतर, हजरत कुराणातील आयते वाचतात आणि अन्नावर फुंकर घालतात. हा विधी दोन्ही वेळा पाळला जातो — जेव्हा दुपारी आणि रात्री जेवण तयार केले जाते,” हाजी हनीफ उल्लाला म्हणाले.
( हे ही वाचा: नोबेल विजेत्या मलाला युसूफझाईचं झालं लग्न; जाणून घ्या कोण आहे तिचा नवरा )
हजरत निजामुद्दीन औलिया दर्ग्याचे निजामी पीरजादा अल्तमश यांनी अल्ट न्यूजला सांगितले, “ते अन्नावर फुंकत आहे, थुंकत नाही. समाजात असे काही लोक आहेत जे हा विधी पाळतात. इतर दर्ग्यांमध्येही, काही उपासक दम (कुराणच्या पठणानंतर फुंकले जाणारे पाणी) ची विनंती करतात. हे बरकत (समृद्धी) आणि कल्याणासाठी आहे. जेवण तयार झाल्यानंतर फातिहा द्यावा लागतो. आमच्या दर्ग्यात अन्नावर फुंकण्याचा विधी आम्ही पाळत नाही. पण त्याचे पालन काही पंथांनी केले आहे.”