Fact check Of Viral Video : पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात कठोर निर्णय घेतले आहेत. या दोन्ही देशांत तणावाची परिस्थिति बघायला मिळत असतानाच सीमेवर देखील दोन्ही देशांकडून सुरक्षा यंत्रणा वाढवण्यात आलेली दिसत आहेत. याचदरम्यान लाईटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर होत असलेला एक व्हिडीओ आढळला. बॉम्बस्फोटाचा व्हिडीओ अल जझीराने पाकिस्तानमधील सियालकोटवर भारतीय सैन्याने केलेल्या हल्ल्याचे फुटेज असल्याचा दावा करत शेअर केला आहे. पण, तपासादरम्यान आम्हाला आढळले की, हा व्हिडीओ जुना आहे आणि गाझाचा आहे, पाकिस्तानचा नाही.
तर नक्की काय होत आहे व्हायरल?
एक्स युजर @tauqeer1632003 ने दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह एक व्हिडीओ शेअर केला. तसेच कॅप्शनमध्ये ‘अल जझीरा चॅनलने भारतीय सैन्याने पाकिस्तानातील सियालकोटवर केलेल्या हल्ल्याचे नवीन फुटेज शेअर केले आहेत’ ; अशी कॅप्शन दिली आहे.
इतर युजर्स देखील अशाच दाव्यासह तोच व्हिडीओ शेअर करत आहेत.
https://twitter.com/thesquirrelsin/status/1917557300681740405
तपास:
आम्ही इनव्हिड टूलवर व्हिडीओ अपलोड करून आणि त्यातून मिळालेल्या कीफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च करून आमची चौकशी सुरू केली.
आम्हाला nrttv.com वेबसाइटवर व्हिडिओचा स्क्रीनशॉट सापडला.
https://www.nrttv.com/detail/31256
लेखात व्हायरल व्हिडीओचा वापर करण्यात आला आहे आणि म्हटले आहे की, इस्रायली सैन्याने गाझा पट्टीतील इंडोनेशियन रुग्णालयाजवळील भागात जोरदार बॉम्बहल्ला केला आहे.
आम्हाला हा व्हिडीओ १५ जून २०२४ रोजी एक्स (ट्विटर) वरील एका पोस्टमध्ये देखील सापडला आहे.
आम्हाला ११ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रकाशित झालेल्या दुसऱ्या लेखात स्क्रीनशॉट सापडला. अहवालात म्हटले आहे की, पॅलेस्टिनी वृत्तसंस्था WAFA नुसार, शिफा आणि इंडोनेशियन रुग्णालयांच्या आसपासचे क्षेत्र, वायव्य गाझामधील रिमाल, शेख रदवान आणि नसर परिसर आणि अल-शाती निर्वासित छावणीत नागरिक राहत असलेल्या घरांवर इस्रायली विमाने आणि तोफखान्यांचा हल्ला झाला.
https://www.sabah.com.tr/dunya/gazzedeki-doktorlar-dunyaya-seslendi-bu-cok-acil-cagridir-artik-ameliyat-yapamayacagiz-6700576
आम्हाला अल जझीरा वर याच विषयावरील एक लेख देखील सापडला.
https://www.aljazeera.com/opinions/2023/11/11/israel-is-bombing-hospitals-in-gaza-with-israeli-doctors-approval
आम्हाला nicovideo.jp या जपानी वेबसाइटवर पोस्ट केलेला व्हिडीओ देखील सापडला. तसेच कॅप्शनमध्ये ‘गाझा पट्टीमध्ये जवळून बॉम्बस्फोट’ ; अशी कॅप्शन दिली होती. हा व्हिडीओ २०२३ मध्ये अपलोड करण्यात आला होता.
https://www.nicovideo.jp/watch/sm43006547
khabarfoori.com वर देखील आम्हाला हेच स्क्रीनशॉट आढळले.
अहवालात म्हटले आहे की, रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या अल जझीरा चॅनेलच्या रिपोर्टरच्या कॅमेऱ्याने अनेक स्फोटांचे लाईव्ह कव्हरिंग केले आणि बॉम्बस्फोटातून वाचण्यासाठी लोक रुग्णालयातून पळून जाताना दिसले.
https://www.khabarfoori.com/%D8%A8%D8%AE%D8%B4-%D8%B3%DB%8C%D8%A7%D8%B3%DB%8C-59/3038426-%D8% AD%D9%85%D9%84%D9%87-%D8%A7%D8%B3%D8%B1%D8%A7%D8%A6%DB%8C%D9%84-%D8%A8%D9%87-%DA%86%D9%86%D8% AF-%D9%85%D8%AA%D8%B1%DB%8C-%D8%A8%DB%8C%D9%85%D8%A7%D8%B1%D8%B3%D8%AA%D8%A7%D9%86-%D8%A7%D9%86%D8%AF%D9%88%D9%86%D8%B2%DB%8C%D8%A7%DB%8C%DB%8C-%D9%88%DB%8C%D8%AF%D8%A6%D9%88
निष्कर्ष: गाझा पट्टीवर इस्रायलने केलेल्या बॉम्बहल्ल्याचा जुना व्हिडीओ पाकिस्तानातील सियालकोट येथे भारतीय सैन्याने केलेल्या गोळीबाराचा आहे, अश्या दाव्यासह व्हायरल केला जातो आहे. त्यामुळे व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे असे सिद्ध होते आहे.