Fact Check Of SP leader Narendra Singh Old Video : लाईटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत असलेला एक व्हिडीओ आढळला; ज्यामध्ये समाजवादी पक्षाच्या नेत्याच्या कपड्यांना आग लागली आहे. असा दावा करण्यात आला होता की, हा नेता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा जाळण्यासाठी रस्त्यावर गेला होता. पण, त्याऐवजी त्याने स्वतःला आग लावून घेतली.
तपासादरम्यान, आम्हाला आढळले की, व्हायरल दावा दिशाभूल करणारा आणि व्हिडीओ जुना आहे. २०२२ च्या निवडणुकीत पक्षाचा पराभव झाल्यानंतर एका समाजवादी नेत्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
काय होत आहे व्हायरल?
इन्स्टाग्राम युजर सागर सर्वेश्वरने दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह व्हायरल व्हिडीओ शेअर केला. यामध्ये एक व्यक्ती “पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा जाळण्यासाठी रस्त्यावर गेला होता. पण, त्याऐवजी त्याने स्वतःच्या कपड्यांना आग लावून घेतली” ; अशी कॅप्शन देण्यात आली आहे.
इतर सोशल मीडिया युजर्स देखील अशाच दाव्यासह हा व्हिडीओ शेअर करत आहेत.
https://www.facebook.com/100064742010763/videos/1889085245184468
https://www.facebook.com/reel/1404580547555275
तपास:
व्हिडीओ इनव्हिड टूलमध्ये अपलोड केल्यानंतर, त्यातून मिळालेल्या कीफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च चालवून आम्ही तपास सुरू केला. तपासादरम्यान आम्हाला तीन वर्षांपूर्वी एनएमटी न्यूजच्या यूट्यूब चॅनेलवर पोस्ट केलेला व्हिडीओ सापडला.
व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, “पराभवाने निराश होऊन समाजवादी पक्षाचे नेते नरेंद्र सिंह उर्फ पिंटू यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना रुग्णालयात दाखल केले”.
त्यानंतर आम्ही कीवर्ड शोध घेतला आणि घटनेसाठी बातम्यांचे अहवाल तपासले.
आम्हाला याबद्दल अनेक बातम्या आढळल्या.
https://indianexpress.com/elections/uttar-pradesh-samajwadi-party-leader-attempts-suicide-7814884
https://www.indiatoday.in/elections/story/sp-worker-attempts-self-immolation-over-party-s-defeat-in-assembly-polls-1923963-2022-03-10
https://www.hindustantimes.com/cities/lucknow-news/immolation-bid-in-up-capital-sp-worker-shifted-to-another-hospital-101647108192814.html
पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी कानपूरमधील एका नेत्याने लखनौमधील विधान भवनाबाहेर आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केला. त्यांनी असेही म्हटले आहे की, नरेंद्र सिंह उर्फ ‘पिंटू’वर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि आगीमुळे ३०% भाजले आहेत. तरीही डॉक्टरांनी त्यांची स्थिती धोक्याबाहेर असल्याचे सांगितले. नरेंद्र सिंह , जे एक व्यापारी देखील आहेत, ते सपाचे कानपूर युनिटचे उपाध्यक्ष आहेत आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवामुळे ते नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.
निष्कर्ष
लखनऊ मध्ये आत्महत्या करतानाचा सपा नेता नरेंद्र सिंह यांचा जुना व्हिडीओ आता अलीकडील असल्याचे सांगत व्हायरल होत आहे. पण, आमच्या तपासनुसार व्हायरल झालेला दावा दिशाभूल करणारा आहे.