अंकिता देशकर
सोशल मीडियावर दररोज हजारो फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही खरे असतात तर काही आपली दिशाभूल करणाऱ्या फोटो आणि व्हिडीओंचाही समावेश असतो. सध्या अशाच एका पादचारी पुलाचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात येत आहे. शिवाय तो फोटो गोरखपूरमधील असल्याचं सांगितलं जातं आहे. या पुलाचे फोटो मुख्यतः गोरखपूर शहर, उत्तर प्रदेशाशी संबंधित फेसबुक ग्रुपमध्ये व्हायरल होत आहे. अनेकांनी हा पूल गोरखपूर शहरातील असल्याचा दावा केला आहे. मात्र या फोटोंचे लाइटहाऊस जर्नलिझमने फॅक्ट चेक केले असता ते फोटो गोरखपूरचे नव्हे तर चीनचे असल्याचं उघडकीस आलं आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Kuldeep Pingoliya त्याच्या प्रोफाइल वर फोटो शेअर केले आहेत.
पोस्टची संग्रहित आवृत्ती पहा.
इतर यूजर्स देखील हा व्हिडिओ शेअर करत आहेत.
तपास –
आम्ही आमचा तपास गूगल रिव्हर्स इमेज सर्च वापरून सुरु केला. त्यावेळी या पुलावर असलेला मजकूर वाचला, हा मजकूर चिनी नाही तर जपानी भाषेतील वाटत होता. रिव्हर्स इमेज सर्चने आम्हाला थेट सूचना दिली की, हा पूल चीनमधील कुनमिंग तेथील पादचारी पूल आहे.
आम्हाला विविध लिंक्समध्ये त्याचे फोटोदेखील सापडले.
https://in.pinterest.com/pin/717409415637414597/आम्हाला खरे चित्र wikimedia वर सापडले.
आणि त्याचा स्रोत flickr.com वर सापडला.
चित्र २९ एप्रिल २०११ रोजी अपलोड केले होते. आम्हाला गेटी इमेजेस, स्टॉक इमेज वेबसाइटवर देखील पुलाचा एक समान फोटो आढळून आला.
गुगल मॅपवरही आम्हाला पुलाचे फोटो सापडले.
https://www.google.com/maps/place/Kunming,+Yunnan,+China/@24.880095,102.832891,3a,75y,90t/data=!3m8!1e2!3m6!1sAF1QipNIOYTeDuIdhlnwjWjtuIebaao_rbtZ9dc-XDZH!2e10!3e12!6shttps:%2F%2Flh5.googleusercontent.com%2Fp%2FAF1QipNIOYTeDuIdhlnwjWjtuIebaao_rbtZ9dc-XDZH%3Dw203-h270-k-no!7i2976!8i3968!4m7!3m6!1s0x36d083c31227d3cb:0xccb1f3a4984f0a36!8m2!3d24.8796599!4d102.83322!10e5!16zL20vMDFjMDZk?entry=ttu
निष्कर्ष: गोरखपूर येथील असल्याचा दावा केलेल्या पादचारी पुलाचा व्हायरल फोटो हा प्रत्यक्षात चीनमधील युनान येथील कुनमिंग येथील आहे.