Fact Check Viral Photo Congress Leader Rahul Gandhi With Zakir Naik : लाईटहाऊस जर्नलिझमला लोकसभा विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत असल्याचे आढळले. या फोटोमध्ये ते इस्लामिक धर्मोपदेशक, अभ्यासक झाकीर नाईक यांच्याबरोबर बसलेले दिसत होते.

आम्ही तपास केला असता हा फोटो बनावट असून तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) साधनांचा वापर करून तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे.

काय होत आहे व्हायरल?

एक्स (युजर) @SanataniRiddhi ने तिच्या प्रोफाइलवर हा फोटो शेअर केला होता आणि कॅप्शनमध्ये “राहुल गांधी यांनी यांच्याशी काय चर्चा केली असेल”, असे लिहिले होते

इतर युजर्सही असाच दावा करून हा फोटो शेअर करत आहेत…

https://twitter.com/Ydavkomal/status/1965410648655073384

तपास…

आम्ही या फोटोचे रिव्हर्स इमेज सर्च (Reverse Image Search) केले. पण, हा फोटो आम्हाला कोणत्याही विश्वसनीय वेबसाइटवर आढळला नाही.

त्यानंतर आम्ही फोटोचे दोन पार्ट करून पुन्हा रिव्हर्स इमेज सुरू केली.

आम्हाला मूळ फोटो अरेबियन डेलीच्या फेसबुक पेजवर २३ मार्च २०२३ रोजी पोस्ट केलेला आढळला; या फोटोमध्ये राहुल गांधी दिसत नव्हते.

https://www.facebook.com/share/p/18yNUc6TL6

या छायाचित्रांमध्ये डॉक्टर झाकीर नाईक यांची ओमानचे ग्रँड मुफ्ती (सर्वोच्च धार्मिक प्रमुख) शेख अहमद अल खलीली, धर्मविषयक मंत्री डॉक्टर मोहम्मद अल मामारी आणि सहायक मुफ्ती शेख कहलान अल खरूसी यांची भेट झालेली दिसते आहे.

त्यानंतर व्हायरल फोटोमध्ये आम्हाला गडबड दिसली. उदाहरणार्थ, झाकीर नाईक यांच्या हाताला सहा बोटे होती, ज्यामुळे हा फोटो एआय निर्मित असल्याचा संशय आला.

आम्ही हा फोटो ‘undetectable.ai’ या AI इमेज डिटेक्टरवर तपासला असता, तो AI ने तयार केलेला असण्याची शक्यता जास्त असल्याचे सिद्ध झाले.

निष्कर्ष : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि झाकीर नाईक यांचा व्हायरल फोटो बनावट आहे. हा फोटो एआय साधनांचा वापर करून बदलून आणि एडिट करून तयार करण्यात आला आहे.