Viral Video Policewoman And Two Goons : ‘लाईटहाऊस जर्नलिझम’ला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर होत असलेला एक व्हिडीओ आढळला. या व्हिडीओमध्ये एक महिला पोलिस अधिकारी आणि दोन गुंडांमध्ये वाद होताना दिसत आहे. दोन्ही पुरुष पोलिस महिलेला लाच देण्याचा प्रयत्न, तर महिला पैसे घेण्यास नकार देताना दिसते आहे. तसेच ही घटना उत्तर प्रदेशातील असल्याचा दावा करण्यात आला आहे.
पण, तपासादरम्यान आम्हाला आढळले की, हा व्हिडीओ स्क्रिप्टेड आहे आणि उत्तर प्रदेशात अशी कोणतीही घटना घडलेली नाही.
काय होत आहे व्हायरल?
एक्स (ट्विटर) युजर @nityaa78 ने हा व्हिडीओ खोट्या दाव्यासह शेअर केला आहे.
इतर युजर्सदेखील अशाच दाव्यासह हा व्हिडीओ शेअर करत आहेत…
तपास…
आम्ही व्हिडीओमधून मिळवलेल्या की-फ्रेमवर (key-frames) रिव्हर्स इमेज सर्च (reverse image search) करून आमचा तपास सुरू केला; या दरम्यान आम्ही व्हिडीओवरील मजकूर काढून टाकला.
त्यामुळे मग आम्हाला हाच व्हिडीओ दोन आठवड्यांपूर्वी ‘अमित दीक्षित सोशल मेसेज’ (Amit Dixit Social Message) या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केलेला आढळला.
व्हिडीओच्या सुरुवातीला स्क्रीनवर एक डिस्क्लेमर (Disclaimer) झळकतो; ज्यात नमूद केले आहे की, व्हिडीओमध्ये दाखवलेली पात्रे काल्पनिक आहेत.
आम्ही पाहिलेल्या या चॅनेलचे ३५.६ हजारांहून अधिक सबस्क्राइबर्स (subscribers) आहेत.
आम्ही यूट्यूब चॅनेलवर नमूद केलेल्या फेसबुक पेज लिंकवर क्लिक केले. या पेजचे शीर्षक ‘ब्युटी ऑफ नेचर’ (beauty of nature) असे होते आणि त्याचे ९३ हजारांहून अधिक फॉलोअर्स (followers) होते.
हाच व्हिडीओ आम्हाला या पेजवरही आढळला.
https://www.facebook.com/reel/755354310671023
निष्कर्ष – पुरुषांशी वाद घालणाऱ्या महिला पोलिसाचा स्क्रिप्टेड व्हिडीओ उत्तर प्रदेशातील खरी घटना घडली आहे असे सांगून शेअर होतो आहे; पण आमच्या तपासानुसार व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.