Viral Video Police Using Tear Gas On Protestors : ‘लाईटहाऊस जर्नलिझम’ला एक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर होताना आढळला. या व्हिडीओमध्ये देशातील काही भागांमध्ये नेपाळसारखी परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे आंदोलकांच्या जमावाला पांगवण्यासाठी पोलीस अश्रुधराच्या नळकांड्या (tear gas) फोडताना दिसले. पण, तपासादरम्यान आम्हाला आढळले की, हा व्हिडीओ झारखंड येथील बोकारो जिल्ह्यातील एका मॉक ड्रिलचा आहे आणि तो खोट्या दाव्यांसह शेअर केला जात आहे.

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक युजर @अनिल हिंदू यांनी हा व्हिडीओ त्यांच्या प्रोफाइलवर शेअर केला.

https://www.facebook.com/reel/699976022403337

इतर युजर्सदेखील असेच व्हिडीओ शेअर करीत आहेत…

https://www.facebook.com/reel/2022972361859082

https://www.instagram.com/p/DPVoQy9gQ6p

तपास :

आम्ही व्हिडीओमधून मिळालेल्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च करून तपास सुरू केला.

त्यामुळे आम्ही यूट्यूबवर एका व्लॉगरने अपलोड केलेल्या दोन मिनिटे ५० सेकंदांच्या व्हिडीओपर्यंत पोहोचलो.

@Life&time108 वर १० दिवसांपूर्वी अपलोड केलेल्या व्हिडीओचे शीर्षक होते… Bokaro Retidih Jharkhand mockdeill vlog

त्यामुळे हे स्पष्ट झाले की, हा व्हिडीओ एका मॉक ड्रिलचा होता.

त्यानंतर आम्ही एक्स (ट्विटर)वर ‘Bokaro mock drill’ या कीवर्ड्ससह शोध घेतला.

त्यामुळे आम्ही बोकारो पोलिसांनी पोस्ट केलेल्या एका पोस्टपर्यंत पोहोचलो.

२७ सप्टेंबर रोजी पोस्ट केलेल्या मजकुरात म्हटले होते : २०२५ मधील आगामी दसरा उत्सवाच्या संदर्भात, पोलीस अधीक्षक बोकारो यांच्या उपस्थितीत, पोलीस लाईन सेक्टर १२, बोकारो येथील परेड ग्राउंडवर आणि माराफारी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत रितडीह, बोकारो येथे उप पोलीस अधीक्षक (शहर), सार्जंट मेजर १ व २, कॉन्स्टेबल आणि इतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहभागातून एक मॉक ड्रिल घेण्यात आली होती.

आम्हाला या मॉक ड्रिलबद्दलचे काही अहवाल / वृत्ते आढळली.

https://www.thekhabarly.com/2025/09/bokaro-police-mock-drill-durga-puja-security-2025.html

आम्हाला ‘Bokaro Ki Awaaj News’ या YouTube चॅनेलवर १० दिवसांपूर्वी अपलोड केलेला एक व्हिडीओ आणि कीवर्ड आढळला.

व्हायरल व्हिडीओमधील दृश्येदेखील या अहवालात दिसली.

निष्कर्ष – दसऱ्यापूर्वी पोलिसांनी केलेल्या एका मॉक ड्रिलचा व्हिडीओ भारतात नेपाळसारख्या झालेल्या आंदोलनाचा व्हिडीओ म्हणून शेअर केला जात आहे. त्यामुळे हा व्हायरल दावा खोटा आहे.