BJP’s Campaign Fact Check Viral Video : ‘लाइटहाउस जर्नलिझम’ला समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेला एक व्हिडीओ आढळला. या व्हिडीओमध्ये लोक भाजपाच्या वाहनाची तोडफोड करताना दिसत होते. काँग्रेसच्या ‘वोटचोर, गड्डी छोड’ (मतचोर, गादी सोड) या आंदोलनामुळे हे घडले असल्याचा दावा केला जात होता. व्हिडीओच्या ऑडिओमध्येही हेच नारे देण्यात येत असल्याचे ऐकू येत आहे.
तपासादरम्यान आम्हाला आढळले की, जरी हे आंदोलन अलीकडचे असले तरीही व्हिडीओ २०२४ चा आहे.
काय होत आहे व्हायरल?
एक्स (युजर)@yoursurajnaik यांनी हा व्हिडीओ त्यांच्या अकाउंटवरून दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह शेअर केला आहे.
इतर युजर्सही असाच दावा करून हा व्हिडीओ शेअर करीत आहेत.
तपास
आम्ही फोटोवरील मजकूर काढून रिव्हर्स इमेज सर्च करून तपास सुरू केला. तेव्हा आम्हाला हा व्हिडीओ ५ मे २०२४ रोजी एक्स (ट्विटर)वर पोस्ट केलेला असल्याचे आढळले.
या पोस्टमध्ये व्हिडीओ हरियाणातील असल्याचा दावा करण्यात आला होता. पण, या व्हिडीओमध्ये ‘वोटचोर गद्दी छोड’चा ऑडिओ नव्हता. या व्हिडीओमध्ये लोक भाजपाचे चिन्ह असलेल्या वाहनाची तोडफोड करताना दिसत होते.
आम्हाला ‘डिजिटल भूमी’ या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केलेला एक व्हिडीओदेखील सापडला.
भाषांतर – सोनिपतच्या महमूदपूरमध्ये भाजपाचे उमेदवार मोहनलाल बडोली यांचा प्रचार करणाऱ्या व्हॅनवरील पोस्टर लोकांनी फाडले.
सोनिपत हे हरियाणातील एक शहर आहे. त्यावरून हे सिद्ध होते की, हा व्हिडीओ हरियाणातील आहे आणि ऑडिओ एडिट करून, एका जुन्या व्हिडीओला जोडला गेला आहे.
निष्कर्ष – हरियाणातील सोनिपत येथील २०२४ च्या व्हिडीओला वेगळा ऑडिओ जोडून शेअर केला जात आहे. त्यामुळे व्हायरल होत असलेला हा दावा दिशाभूल करणारा आहे.
