Fact Check Viral Video PM Narendra Modi being welcomed in China : लाइटहाऊस जर्नालिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेला एक व्हिडीओ आढळला. या व्हिडीओत असा दावा केला जात होता की, हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अलीकडील चीन दौऱ्यातील आहे; जिथे लोकांनी भाजपाचे झेंडे घेऊन त्यांचे स्वागत केले. पण, तपासादरम्यान आम्हाला आढळले की हा व्हिडीओ चीनमधील नसून गुजरातमधील अहमदाबाद येथील आहे.
काय होत आहे व्हायरल?
इन्स्टाग्राम युजर @_modi_jee_143 ने हा व्हिडीओ त्याच्या प्रोफाइलवर दिशाभूल करणाऱ्या दाव्याबरोबर शेअर केला आहे. तसेच “जेव्हा चीनमध्ये भाजपाचे झेंडे फडकू लागले”; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.
इतर युजर्सदेखील हा व्हिडीओ याच दाव्याने शेअर करत आहेत…
तपास
आम्ही व्हिडीओचा स्क्रिनशॉट घेऊन रिव्हर्स इमेज सर्च करून तपास सुरू केला.
यामुळे आम्हाला जनसत्ताच्या यूट्यूब चॅनेलने २६ ऑगस्ट २०२५ रोजी अपलोड केलेला एक यूट्यूब शॉर्ट व्हिडीओ सापडला.
कॅप्शनमध्ये म्हटले होते… “पंतप्रधान मोदींच्या अहमदाबाद दौऱ्यामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला असून त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.”
आम्हाला २५ ऑगस्ट २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यूट्यूब चॅनेलवरही हा व्हिडीओ सापडला…
कॅप्शनमध्ये म्हटले होते… “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमधील अहमदाबाद येथे एक रोड शो केला. नागरिकांनी मोठ्या संख्येने पंतप्रधानांचे स्वागत केले.”
आम्हाला हा व्हिडीओ इतर अनेक चॅनेलवरही सापडला.
निष्कर्ष – पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चीनमध्ये भाजपाच्या झेंड्यांसह स्वागत झाल्याच्या दाव्याने शेअर होत असलेला व्हायरल व्हिडीओ प्रत्यक्षात अहमदाबादमधील आहे, त्यामुळे व्हायरल होत असलेला दावा दिशाभूल करणारा आहे.