फरिदाबाद पोलिसांनी या शनिवारी सोशल मीडियावर बाईक चोर ओळखण्यासाठी बॉलिवूड प्रेरित बॉलीवूडच्या गाण्यासह पोस्ट शेअर केली. पोलिस खात्याने दुचाकी चोर ओळखा असही लिहलं होत हे बघून अनेकजण बुचकळ्यात पडले. गुन्हेगारांच्या छायाचित्रासह ‘भोली सी सुरत’ च्या गाण्याच्या ओळी टाकल्या होत्या. शनिवारी ट्विटरवर , फरिदाबाद पोलिसांनी लिहिले “भोली सी सुरत, काम में सुस्ती, मोटरसायकल चुरा, हाय (निष्पाप चेहरा, कामाच्या वेळी आळशी, (तो) मोटारसायकल चोरतो).” १९९७ च्या हिट चित्रपट ‘दिल तो पागल है’ मधील ‘भोली सी सुरत’ या गाण्याच्या रीवर्किंगच्या रूपात लिहलेले गाणे बॉलीवूडचे चाहते असलेल्यांनी कॅप्शनला बघून लगेच गाण ओळखलं.

भन्नाट हॅशटॅगचाही वापर

“भोली सी सुरत, काम में सुस्ती, मोटरसायकल चुरा, हाय” हे एवढचं लिहून त्यांचं कॅप्शन सपलं नाही. फरिदाबाद पोलिसांनी कॅप्शनसोबत एक हॅशटॅगही शेअर केला. #अब_तो_अंदर_हाय, असं त्यांनी लिहिले. हा हॅशटॅग फॉलोअर्सला सूचित करतो की दुचाकी चोरला तुरुंगात टाकण्यात आले आहे. या ट्विटला ६,००० पेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. अनेकांनी इतर संभाव्य गुन्हेगारांना चेतावणी देण्यासाठी विभागाच्या विनोदबुद्धीची प्रशंसा केली. नेटीझन्सनी ही घटना जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी शेअरसुद्धा केली आहे. जवळ जवळ १००० लोकांनी हे ट्विट रीट्विट केलं आहे.

मुंबई पोलिसांचेही ट्विट झाले होते व्हायरल

या महिन्याच्या सुरुवातीला, मुंबई पोलिसांनी मोटारसायकल चालकांना धोकादायक स्टंट करण्याचा इशारा देण्यासाठी असाच एका लोकप्रिय गाण्याचा वापर केला होता. क्लिप शेअर करताना, मुंबई पोलिसांनी एक्वाच्या हिट ‘बार्बी गर्ल’ गाण्याचे शब्द वापरून सर्व स्टंट रायडर्सना इशारा दिला होता. “लक्ष द्या बार्बी गर्ल, हे खरे जग आहे जीवन प्लास्टिक नाही- सुरक्षितता चांगली!” पोलिस विभागाने नेटीझन्सला आठवण करून दिली. ते पुढे लिहतात की, दोन्ही आरोपींवर आयपीसीच्या कलम २७९ आणि एमव्हीए कलमांखाली धोकादायक पद्धतीने वाहन चालवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नेटीझन्सच्या प्रतिकिया