Viral video: शेतकरी होणं सोपी गोष्ट नाही. ऊन, वारा, पाऊस झेलत शेतकरी दिवस-रात्र शेतामध्ये कष्ट करीत राहतो. शेती करताना शेतकऱ्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. कधी पक्ष्यांपासून पिकाचं रक्षण करावं लागतं, तर कधी शेतात लपलेल्या प्राण्यांपासून स्वत:चा जीव वाचवावा लागतो. दरम्यान, तुम्हीही शेतात काम करण्यासाठी जात असाल, तर हा व्हिडीओ पाहा. या शेतकऱ्याबरोबर काय झालं ते पाहून तुम्हालाही धडकी भरेल. झालं असं की सोयाबीनच्या पिकात चक्क बिबट्या लपून बसला होता. यानंतर शेतकरी जेव्हा शेतात गेला तेव्हा काय झालं तुम्हीच पाहा. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
सामान्यतः वाघ, सिंह आणि बिबट्या हे जंगलात अतिशय धोकादायक शिकारी प्राणी मानले जातात. कितीही मोठा प्राणी असूदेत बिबट्याला बघून पळून जातो. काही वन्य प्राणी असे असतात की ते जंगलात असो किंवा दुसरीकडे कुठे, त्यांची भीती कायम असते. मात्र बिबट्या हा अतिश हुशार प्राणी आहे, त्याला आपली शिकार कशी शोधायची हे बरोबर माहित असतं. असाच हा बिबट्या सोयाबीनच्या पिकात लपून बसला होता. मात्र ज्यावेळी शेतकरी तिथे आला तेव्हा तो शेतकऱ्यावर हल्ला करण्यासाठी पुढे आला. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही घाम फुटेल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बिबट्या हल्ला करायला पुढे येताच शेतकऱ्यानं हिम्मत दाखवत त्याच्याशी दोन हात केले आहेत. शेतकरी काठीनं बिबट्याला मारण्याचा प्रयत्न करतो. बिबट्याही हिंसक झाल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. तसंच तो मध्ये मध्ये सोयाबीनच्या पिकात लपतही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात जाताना सावध राहिलं पाहिजे.
पाहा व्हिडीओ
बिबट्या हा सर्वात खतरनाक शिकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. किंबहूना तो वाघ-सिंहापेक्षाही जास्त खतरनाक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण हे प्राणी फक्त जंगलात शिकार करतात. पण बिबट्या तर पार लोकांच्या घरात शिरून माणसं उचलून नेतो. असाच काहीसा हा प्रकार समोर आला आहे. हा व्हिडीओ prashant__c007 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.