scorecardresearch

Premium

Video : डीजे बी फेल तुझ्या पुढं ! चिमुकल्याने वाजवली हलगी ; कलेचं होतंय कौतुक..

पहिली इयत्तेत शिकणाऱ्या चिमुकल्याने शाळेत कार्यक्रमादरम्यान हलगी वादन सादर करून दाखवले आहे

First class students played halgi in school program
(सौजन्य:इन्स्टाग्राम/ @halgilovervicky) डीजे बी फेल तुझ्या पुढं ! चिमुकल्याने वाजवली हलगी ; कलेचं होतंय कौतुक..

Viral Video : सध्याच्या काळात सणांदरम्यान डीजे, बँजो यांचा उपयोग जास्त करण्यात येतो. पण गावातील शुभकार्य, मिरवणूक किंवा एखाद्या कार्यक्रमादरम्यान अनेकदा हलगीचे वादन केले जाते. आज असंच काहीसं सोशल मिडियावरसुद्धा पहायला मिळालं. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये शाळेतील चिमुकला हलगी वाजवताना दिसत आहे ; जे पाहून तुम्हीही काही क्षणासाठी चकित व्हाल आणि चिमुकल्याच्या कलेला दाद द्याल.

व्हायरल व्हिडीओ गावातील शाळेचा आहे. शाळेत एखादा कार्यक्रम चालू आहे. शिक्षक खुर्च्यांवर तर विद्यार्थी शाळेच्या क्रीडांगणावर बसले आहेत. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या अगदी मधोमध एक चिमुकला हलगी वाजवताना दिसत आहे. त्याने शाळेचा गणवेश परिधान केला असून हातात हलगी पकडली आहे. टिपरूने( लवचिक काडीच्या सहाय्याने) तो हलगी वाजवत आहे. चिमुकल्याच्या हलगी वादनाचे स्वर तुम्हालाही ठेका धरायला नक्कीच भाग पाडतील. चिमुकल्याचे हलगी वादन तुम्हीसुद्धा एकदा व्हिडीओतून बघाचं…

Gutami sai mrunmayi
गौतमी देशपांडे ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याला करतेय डेट? सई ताम्हणकरच्या कमेंटवर उत्तर देत मृण्मयी म्हणाली…
gang rape
संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
ajit pawar
“माझ्याकडील अर्थखातं पुढं टिकेल, नाही टिकेल सांगता येत नाही, पण…”, अजित पवारांचं विधान

हेही वाचा…पठ्ठ्याने १२ वर्षे घाम गाळला अन् चक्क जमिनीखाली बांधली दुमजली इमारत; आनंद महिंद्रा Video शेअर करीत म्हणाले, “शिल्पकार…”

व्हिडीओ नक्की बघा :

पहिलीच्या विद्यार्थ्याने शाळेत वाजवली हलगी :

हलगी वादन सादर करणारा चिमुकला शाळेत पहिली इयत्तेत असल्याचं सांगण्यात येतं आहे. तसेच तो साताऱ्याचा राहणारा आहे. इतक्या लहान वयात चिमुकल्याची हलगी वाजवण्याची कला पाहून शिक्षक, विद्यार्थी आणि परिसरात जमलेली अज्ञात माणसं एकटक त्याच्याकडे बघत आहेत. अलीकडे डीजे आणि बँजो या नव्या संगीत उपकरणांमुळे हलगी वादनाची कला दुर्लक्षित होत आहे पण, आज या चिमुकल्याच्या निमित्त्याने पुन्हा एकदा हलगी वादनाचा आंनद अनेकांना घेता येणार आहे.

चिमुकल्याचा हलगी वादनाचा हा व्हिडीओ @halgilovervicky या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना ‘पहिलीत शिकणारा विदयार्थी , करालं तेवढं कौतुक कमीचं’ असे कॅप्शन देण्यात आले आहे. व्हिडीओ पाहणारे अनेकजण चिमुकल्याचे हलगीवादन पाहून, ‘डीजे बी फेल तुझ्या पुढं !’, ‘नादापुढं सगळं बाद’ , ‘हे फक्त मराठी शाळेतचं बघायला मिळेल’ अशा विविध प्रतिक्रिया देत आहेत. तर ”जन्माबरोबर कला सुद्धा जन्म घेते, नक्कीच या लहान कलाकारांचे वडील, आजोबा हलगी वादन करणारे हाडाचे कलाकार असतील” अशी कमेंट एका युजरने केली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-09-2023 at 19:26 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×