वर्क लाईफ बॅलेंस करणे आजकाल सर्वात मोठे चॅलेंज बनले आहे. अनेकांना कामाच्या ठिकाणी दररोज नव्या आव्हानांना तोंड द्यावे लागते. यात जर कामावरचे सहकारी चांगले असतील तर थोडा आधार असतो, पण बॉसच कटकटी असेल तर अनेक समस्यांना समोरे जावे लागते. यामुळे सोशल मीडियावरही अनेक युजर्स आपल्या वर्कलाइफमुळे निर्माण झालेली चिडचिड व्यक्त करत असतो. सध्या अशाच एक पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे जी आता युजर्सचे लक्ष वेधून घेत आहे. आत एक बॉस आपल्या कर्मचाऱ्याला आधी कामावरून काढून टाकतो आणि नंतर त्याच्याकडून कामाचे अपडेट्स घेत असतो, त्यावर कर्मचारी असा काय संतापतो आणि तो बॉसचीच उलटी फिरकी घेण्यास सुरुवात करतो. Reddit वर या बॉस आणि कर्मचाऱ्यामधील चॅटचे स्क्रीन शॉर्ट व्हायरल होत आहे.
आधी नोकरीवरु काढले, मग घेतल होता कामाचे अपडेट
व्हायरल होणाऱ्या चॅटच्या स्क्रीनशॉर्टमध्ये तुम्ही पाहू शकता की, कर्मचाऱ्याचा एक्स बॉस इन्व्हेंटरीवरील अपडेटबद्दल विचारत असतो. या प्रश्नावर गोंधळलेल्या कर्मचारी बॉसलाच विचारतो की, तुम्ही मला कामावरून काढले आहे की नाही. ज्यावर बॉस उत्तर देतो, होय….या उत्तरानंतर बॉस पुढे म्हणतो की, तुम्ही इन्व्हेंटरी आणि रविवारची ऑर्डर तयार केली आहे. ती कुठे आहे, असा प्रश्न मला पडला आहे.
कामावरुन काढून टाकल्यानंतर बॉसचे अशाप्रकारचे वागणे पाहून संतापलेल्या कर्मचाऱ्याने उत्तर दिले की, तुम्ही एखाद्याला नोकरीवरून काढता आणि त्यानंतरही त्या कर्मचाऱ्याला कामाबद्दल प्रश्न विचारण्यासाठी संपर्क करता. का तुम्हाला त्या कामाबद्दलची माहिती नाही का?
सध्या सोशल मीडियावर या बॉस आणि कर्मचाऱ्यामधील चॅटचे स्क्रीनशॉर्ट तुफान व्हायरल होत आहे. ScooterBobb नावाच्या युजरने Reddit वर त्याच्या एक्स बॉससोबतच्या चॅटचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. हे चॅटचे स्क्रीनशॉर्ट शेअर करताना या व्यक्तीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मी अजूनही शॉकमध्ये आहे’.
हा काय मूर्खपणा आहे, इंटरनेटवर युजर्सच्या रिएॅक्शन
ही पोस्ट काही महिन्यांपूर्वी इंटरनेटवर शेअर करण्यात आली होती. पोस्ट शेअर केल्यापासून आतापर्यंत १ लाखांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केली आहे. एक्स बॉसच्या या विचित्र वागण्यावर अनेक जण वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एकाने मजेशीर कमेंट करत लिहिले की, ‘तुम्हाला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे पण आता तुम्ही कामावर परत जा.’ आणखी एका युजरने संताप व्यक्त करत लिहिले की, ‘हा काय मूर्खपणा आहे.’ याशिवाय एक युजर म्हणतो की, अशा बॉसला ब्लॉक केले पाहिजे.’