सोशल मीडियावर असे बरेच व्हिडिओ व्हायरल होत असतात जे आपल्याला आश्चर्यचकित करतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून तुम्हाला विश्वासच बसणार नाही. तुम्ही कधी माशाला साप गिळताना पाहिलंय का? कदाचित नसेल. पण या व्हायरल व्हिडिओमध्ये एक मासा चक्क सापाला गिळताना दिसतोय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तुम्हालाही खात्री होत नसेल तर हा व्हिडीओ एकदा पाहाच.
११ सेकंदाचा हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका खड्ड्यात पाणी जमलेले आहे. अचानक त्याठिकाणी साप येतो. सापाचा आवाज येताच मासा देखील पाण्यातून बाहेर येतो. तेवढ्यात मासा आपले तोंड उघडतो आणि साप त्याच्या तोंडात जाऊ लागतो. कदाचित सापाला वाटले असावे की माशाचे तोंड म्हणजे बीळ आहे. मासा हळूहळू सापाला संपूर्ण गिळतो. हा व्हिडीओ पाहून क्षणभर तुमच्याही अंगावर काटा येईल. या व्हिडिओमध्ये पुढे काय झाले? साप माशाच्या पोटातून बाहेर पडला का? या प्रश्नाची उत्तरे मिळू शकली नाहीत. मात्र हा व्हिडिओ खरचं थक्क करणारा आहे.
बापरे! माशाने चक्क सापचं गिळला
( हे ही वाचा: भल्यामोठ्या मगरीने म्हशीचे नाकचं पकडले; जीव वाचवण्यासाठी म्हशीची मृत्यूशी झुंज, पाहा थरारक Video)
हा व्हिडीओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होतोय. आतापर्यंत या व्हिडिओला भरपूर व्ह्यूज मिळाले असून अनेकजणांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. तसंच खूप जणांनी यावर कंमेंट करायला देखील सुरुवात केली आहे.