लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला खूप खास दिवस असतो. त्यादिवशी सगळं व्यवस्थित पार पडावं कोणतेही विघ्न येऊ नये यासाठी सर्व गोष्टींची व्यवस्थित तयारी केली जाते. त्या आनंदाच्या दिवशी आपल्या नातेवाईक, मित्रमंडळी सर्वांनी या शुभप्रसंगी हजेरी लावावी अशी वधु वरांची इच्छा असते. तर ही मंडळी देखील वधु वरासाठी त्यांचा हा दिवस आणखी खास बनवण्यासाठी सरप्राईज प्लॅन करतात. अशा सरप्राईज देण्यासाठी भन्नाट कल्पना तुम्ही पाहिल्या असतील. अशाच एका सरप्राईजचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल होणारा हा व्हिडीओ शिकागो येथे भारतीय पद्धतीने झालेल्या लग्नातील आहे. परदेशात वास्तव्यास असणाऱ्या या भारतीय वरासाठी त्याच्या दोन मित्रांनी लग्नात एक भन्नाट सरप्राईज दिले. नवरदेवाच्या या मित्रांनी चक्क साडी नेसून या लग्नाला हजेरी लावली. जेव्हा वधु आणि वर या दोघांनी त्यांना या कपड्यांमध्ये पाहिले तेव्हा त्यांना हसू अनावर झाले. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

आणखी वाचा : रिपोर्टींग थांबवण्यासाठी हत्तीने केले असे काही की…; Viral Video पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू

व्हायरल व्हिडीओ :

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काळानुसार प्रत्येक व्यक्तीची कपड्यांची निवड बदलते. आजकाल अनेक स्त्रिया पुरुषांची फॅशन फॉलो करताना दिसतात, तर अनेक पुरुषही स्त्रियांचे कपडे परिधान करताना दिसतात, यात त्यांना कोणताही कमीपणा असल्याचे वाटत नाही. शिकागोमधील लग्नात या पुरुषांनी साडी नेसून येण्याचा हा निर्णय जेंडर स्टीरीओटाईप नष्ट होत असल्याचे दाखवणारा आहे, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत. हा व्हिडीओ ‘पॅरागॉन फिल्म्स’ या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला ५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.