Viral Video : सध्या देशात लग्न समारंभ उत्साहाने साजरे केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर लग्नाचे अनेक नवनवीन व्हिडोओ व्हायरल होत आहे. काही व्हिडीओ इतके मजेशीर आहेत की तुम्हाला हसू आवरणार नाही तर काही व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नवरीला वरमाला घालताना नवरदेव असे काही करतो की पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. काही लोकांना व्हिडीओ पाहून हसू येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
भारतीय लग्नात अनेक परंपरा दिसून येतात. तुम्हाला लग्नातील ती परंपरा आठवते का, जेव्हा नवरदेव किंवा नवरी एकमेकांना वरमाला घालतात तेव्हा त्यांचे जवळचे लोक त्यांना वर उचलतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नवरदेव नवरीला वरमाला घालणार तितक्यात काही नातेवाईक येतात आणि नवरीला वर उचलतात. नवरदेवाला काय करावे, हे सुचत नाही. अशावेळी नवरदेव थेट नवरदेव नवरीच्या सोफ्यावर चढतो आणि नवरीच्या गळ्यात वरमाला टाकायला जातो. पण त्याचा तोल जातो आणि नवरीच्या गळ्यात वरमाला पडत नाही पण नवरी मात्र खाली पडते. नवरीसह तिला उचलणारे नातेवाईक सुद्धा खाली पडतात. या वेळी नवरीसह काही नातेवाईकांना हसू आवरत नाही. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
हेही वाचा : PHOTO: विद्यार्थ्यानं उत्तरपत्रिकेत ‘जय श्री राम’बरोबर लिहलं असं काही की…पास करणाऱ्या शिक्षकांनाही केलं निलंबित
Sarita sarawag या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “सरकारी नवरदेवाला कमी समजू नका” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “याला म्हणतात उंच उडी” तर एका युजरने लिहिलेय, “लग्न समारंभ हल्ली मजेशीर होताना दिसत आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “बास्केटबॉल कोटातून नवरदेवाला नोकरी मिळाली वाटते” अनेक युजर्सनी व्हिडीओ पाहून हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.