Diwali Funny Video : दिवाळीच्या उत्साही वातावरणनिर्मितीला सुरुवात झाली आहे. प्रत्येक घरात साफसफाई, सजावट आणि खरेदी सुरू आहे. दिवाळीचा जल्लोष सुरू होण्याआधीच सोशल मीडियावरील एका छोट्या मुलीचा गोंडस व्हिडीओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. फटाक्यांच्या आवाजात आणि प्रकाशात ती मुलगी जेव्हा “हॅपी दिवाळी” म्हणते, तेव्हा पाहणाऱ्यांच्या चेहऱ्यावर आपोआप हसू येतं. हा व्हिडीओ इतका मजेदार आहे की, लोक तो वारंवार पाहत आहेत आणि शेअरही करीत आहेत. यंदा सोमवार, २० ऑक्टोबर रोजी दिवाळी साजरी होणार असून, लोक एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरत आहेत. काही मीम्स, काही क्रिएटिव्ह पोस्ट्स व काही गोंडस व्हिडीओंमुळे सोशल मीडियावर हास्याची बरसात झाली आहे. त्यातच सध्या एका छोट्याशा मुलीचा व्हिडीओ लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवत आहे.

हा व्हिडीओ दिवाळीच्या रात्रीचा असून, एका लहानशा मुलीच्या निरागस रिअॅक्शनवर आधारित आहे. सणाची धूम, फटाक्यांचा आवाज व प्रकाशानं सजलेलं वातावरण पाहून, ती मुलगी आश्चर्यचकित झालीय. पहिली दिवाळी पाहण्याचा अनुभव तिच्या डोळ्यांत दिसतोय आणि त्या अनुभवाला ती आपल्या भाषेतून व्यक्त करीत आहे.

पाहा व्हिडिओ

व्हिडीओमध्ये ती छोटी मुलगी कोणाच्या तरी कुशीत बसलेली दिसते. बाहेर फटाके फुटत आहेत, ती वर आकाशात फटाके फुटताना पाहते, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर कुतूहल, थोडी भीती आणि त्याचबरोबर निरागस आनंद असं भावभावनांचं संंमिश्र मिश्रण एकत्रि दिसतं. अचानक एक मोठा फटका फुटल्यावर ती मुलगी थोडीशी घाबरते आणि त्या घाबरलेल्या पण गोड आवाजात म्हणते – “हॅपी दिवाळी!” तिचं ते निरागस बोलणं आणि चेहऱ्यावरील एक्स्प्रेशन पाहून प्रेक्षक हसून लोटपोट होत आहेत.

हा व्हिडीओ जरी मागील वर्षीचा असला तरी पुन्हा एकदा तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. लोक या व्हिडीओखाली कमेंट करताना लिहितायत – “ही मुलगी खूप क्यूट आहे,” “याच व्हिडीओनं माझा मूड फ्रेश केला,” “खरी दिवाळी यालाच म्हणतात!” तर काहींनी तर लिहिलं आहे की, “या गोंडस व्हिडीओनं दिवाळीचा मूड आधीच बनवला.” अनेकांनी हा व्हिडिीओ आपल्या मित्र-मैत्रिणींना शेअर करून “हॅपी दिवाळी“ म्हणण्याचा नवा अंदाज सुरू केला आहे. एका छोट्या मुलीच्या गोंडस “हॅपी दिवाळी” म्हणण्याने सोशल मीडियावर दिवाळीचा उत्साह आणखी वाढवला आहे आणि सगळीकडे आनंदाचे वातावरण निर्माण केले आहे.