सोशल मीडियावर लग्नाचे अनेक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही फनी असतात, जे बघितल्या बघितल्या लोटपोट होऊन हसायला येतं. तर काही व्हिडीओ पाहून आश्चर्यही वाटतं. असे व्हिडीओ यूजर्सना आवडतातही आणि ते शेअर करून त्यावर कमेंट्सही करतात. लग्न समारंभीत नेहमीच गमती-जमती चालत राहतात. अनेक नवरी-नवरदेव गंमत करतात. तर काही पाहुणेही त्यांची मजा घेतात. खास करुन नवरदेवाच्या किंवा नवरीच्या कलवऱ्यांची तर लग्नात हमखास चर्चा असते. कधी नवरदेवाचे बूट चोरतात तर कधी नवरदेवासोबत गंमत करतात. असाच एक लग्नातला व्हिडीओ सध्या समोर आला आहे, हा व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल अशी मेहुणी नको रे बाबा

या व्हायरल होत असणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मेहुणीने नवरदेवाची अशी अवस्था केली, की तो कुठे तोंडही दाखवू शकला नाही. अनेक ठिकाणी लग्नानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पाठवणीच्या वेळी एक विधी पार पाडला जातो. मेहुणी नवरदेवाच्या चेहऱ्यावर स्प्रे मारताना दिसते. यामुळे त्याचा संपूर्ण चेहरा पांढरा होऊन जातो. मेहुणीने आपल्या दाजीचा चेहरा असा करून टाकला की त्याचं तोंडही तो दाखवू शकला नाही. यासोबतच मेहुणीने नवरदेवाशेजारी बसलेल्या इतर लोकांसोबतही असंच केलं.

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Sandeep Sharma (@sharma9670820990)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – ‘ऐ मेरे वतन के लोगों’ व्हाईट हाऊसमध्ये गायलं भारतीय गाणं, आनंद महिंद्रांनी Video शेअर करत केलं वचन पूर्ण

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरीही या व्हिडीओवर गंमतीशीर प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत.