Gautami Patil New Dance Video: २०२३ मधील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या प्रकरणांचा विचार केला तर गौतमी पाटील हे नाव यादीत आल्यावाचून राहणार नाही. कित्येक वर्षांपासून डान्स शो करणाऱ्या गौतमीने एका कार्यक्रमात केलेला अश्लील इशारा इतका व्हायरल झाला की गौतमीच्या नावाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रासह जगभरात झाली. मनोरंजन विश्वच नाही तर गौतमीने राजकारणातही आपल्या नावाची हवा केली. काही वेळा आरोप- प्रत्यारोप होताना तर काही वेळा टीका- कौतुक- टोलेबाजी करतानाही गौतमी पाटील हे नाव वापरलं जाऊ लागलं. पांढऱ्या साडीतील त्या व्हायरल व्हिडिओनंतर गौतमीने माफी मागून आपण पुन्हा असं करणार नाही असा शब्द दिला होता पण त्याच पाठोपाठ गौतमीचा आणखी एक व्हिडीओ लीक झाला ज्यामध्ये ती कपडे बदलतानाची क्लिप कुणीतरी व्हायरल केली होती. यावरून टीकाकारांनी सुद्धा गौतमीची पाठराखण केली. आता सोशल मीडियावर गौतमीचा एक नवा व्हिडीओ चर्चेत आहे ज्यावरून पुन्हा एकदा संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत.

गौतमी पाटीलच्या एका डीजे शो मधील हा व्हिडीओ असावा असा अंदाज आहे. अनेकदा अशा कार्यक्रमांमध्ये गौतमीबरोबरच उपस्थितांच्या डान्स मूव्ह्ज सुद्धा लक्ष वेधून घेतात. तसाच काहीसा प्रकार याही व्हिडिओमध्ये पाहायला मिळतोय. गौतमीने एका मुलीला आपल्याबरोबर डान्स करण्यासाठी स्टेजवर बोलावले होते, गौतमी तिच्या स्टेप्स त्या चिमुकलीला शिकवत होती पण तितक्यात आधीपासून सराव करून आल्याप्रमाणे ही मुलगी डिट्टो गौतमीसारखीच नाचू लागली. या दोघींची ऊर्जा, उत्साह व स्टेप्स इतक्या सारख्या होत्या की गौतमी स्वतः चकित झाली आणि त्या मुलीला आनंदाने मिठी मारली.

दरम्यान, गौतमी व चिमुकलीच्या या व्हिडीओवर अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या कमेंट्स केल्या आहेत. काहींनी त्या मुलीच्या नृत्य कौशल्याचे कौतुक केलेय तर काहींनी घ्या आता ही गौतमी बाकी लहान लहान मुलींना सुद्धा स्वतःसारखंच बनवतेय म्हणत टीका केली आहे. काहींना टीकाकारांना सुद्धा फटकारत तुम्ही तिची कला बघा वाईट विचार डोक्यातून काढून टाका असा सल्ला दिला आहे. तर काही कमेंट्समध्ये नेटकरी एकमेकांशी काय चांगलं काय वाईट यावरून वाद घालत आहेत.

हे ही वाचा<< ४ वेळा मास्टर्स व पीएचडी नावावर असूनही डॉक्टर विकतायत भाजी; कारण सांगत म्हणाले, “पगारापेक्षा दिवसभर..”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका महिलेच्या अकाउंटवरून केलेली कमेंट मात्र या सगळ्यात लक्ष वेधून घेते ती म्हणजे, “नको गं बाळा तू तलवारबाजी शिक… कराटे किक बॉक्सिंग शिक त्याचे व्हिडिओ बघायला आवडतील पण हिच्याबरोबर नाचलेले व्हिडिओ बघायला बिलकुल आवडणार नाही”, तर यावरच एका अन्य युजरने “लावणी परंपरा जपावी म्हणायचं आणि विरोध पण करायचा… काय दोन तोंडी माणसं आहेत वां…” अशी कमेंट केली आहे.