जगात भयंकर प्राण्यांची संख्या भरपूर आहे. सिंह, वाघ, बिबट्या, चित्ता, मगरी इत्यादी धोकादायक प्राण्यांमध्ये गणले जातात. जर त्यांना कुठलाही भक्षक किंवा माणूस आढळला तर ते त्याला फाडू शकतात. विशेषत: मगरींबद्दल बोलायचे तर, त्या खूप भयानक असतात. ज्यांच्यामध्ये सिंहाची करण्याची देखील क्षमता असते. तुम्ही सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील , ज्यामध्ये मगरी सिंह किंवा वाघाची शिकार करताना दिसत आहेत. आजकाल असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो थरकाप उडवणारा आहे.

वास्तविक, या व्हिडिओमध्ये एक महाकाय मगर एका मोठ्या माशाला मारताना आणि नंतर त्याला खाताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मगरीने एका महाकाय माशाची शिकार केली आहे आणि त्याला आपल्या मोठ्या तोंडात दाबले आहे. मग तो माशाला जमिनीवर जोरात आपटतो, त्यामुळे मासा मरतो. मात्र, आधीच मासे बेशुद्ध झाल्याचे दिसून येत आहे. त्याची हालचालही होत नाही. मासा मेला असल्याची मगरीला खात्री पटल्यावर ती त्याला आरामात गिळते. जेव्हा मगर मासा संपूर्ण गिळते तेव्हा तो हळूहळू पाण्यात जाऊ लागते.

(हे ही वाचा: बैलाने सीटबेल्ट बांधून केली चक्क बाईकची सफर; व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण)

मगरीने एका झटक्यात मासा कसा गिळला ते पहा

(हे ही वाचा: Viral Video: माणसाने पाण्यात शार्कसोबत केला रोमँटिक डान्स; व्हिडीओ पाहून तुम्हालाही घाम फुटेल)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @natureisbruta1 नावाच्या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. अवघ्या १५ सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत ६७ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाईकही केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.